Ahmednagar Politics : माजी खासदार वाकचौरे 'शिवबंधना'साठी मातोश्रीकडे रवाना; ठाकरेंना मिळणार बळ?

Bhausaheb Wakchaure Join Shivsena Thackeray Group : "दोन्ही पक्षांतरे त्यांच्या पथ्यावर न पडता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले."
Ahmednagar Politics
Ahmednagar PoliticsSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे -

Ahmednagar News : प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले भाऊसाहेब वाकचौरे 2009 साली लोकसभेच्या रिंगणात उतरून शिवसेनेकडून खासदार झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडीचे तत्कालीन दिग्गज उमेदवार रामदास आठवले यांचा त्यांनी धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास केलेले वाकचौरे आज पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यासाठी पहाटेच वाकचौरे मुंबईकडे रवाना झाले. वाकचौरे यांनी शिर्डीत साईसमाधी मंदिराचे कलशदर्शन करत 'मातोश्री'कडे निघाले. (Latest Marathi News)

Ahmednagar Politics
Buldhana Politics News: प्रतापराव जाधवांना ठाकरे शिकवणार धडा ? बुलडाणा लोकसभेसाठी लावली 'फिल्डिंग'

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीकडून मतदारसंघ आणि उमेदवारांच्या चाचपणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेने जिल्ह्यानिहाय स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत पक्षात येणाऱ्यांच्या हातात शिवबंधन बांधत पक्षप्रवेश सुरू केला आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेच्या दृष्टीने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्ष प्रवेश मोठा चर्चेत असून, आज(२३ ऑगस्ट) हा शिवबंधन सोहळा दुपारी १२ वाजता मातोश्रीवर पार पडणार आहे. (Bhausaheb Wakchaure Join Shivsena Uddhav Thackeray Group)

भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात आले. त्यांना विखे परिवाराचा नेहमीच वरदहस्त लाभला. 2009 लोकसभेला काँग्रेस आघाडीने आरपीआयचे रामदास आठवले यांनी शिर्डीतून उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसकडे ओढा असलेले वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत लोकसभा लढवली. आठवलेंच्या विरोधात "ॲट्रॉसिटी" विषयावर निर्माण केलेल्या वातावरणात वाकचौरे निवडून आल्याचे बोलले जाते.

Ahmednagar Politics
Ajit Pawar In Baramati : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा पहिल्यांदाच बारामतीत; मतदारांपुढे काय भूमिका ठेवणार?

वाकचौरे यांनी 2014 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र करून त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा लढवली. त्यानंतर लागलीच काँग्रेसला रामराम करत भाजपा मधून श्रीरामपूर विधानसभा लढवली. मात्र ही दोन्ही पक्षांतरे त्यांच्या पथ्यावर न पडता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा बदलत्या आणि अनुकूल राजकिय परिस्थितीत वाकचौरे ठाकरेंच्या शिवसेनेत आज प्रवेश करत आहे.

Ahmednagar Politics
Sharad Pawar Vs Eknath Shinde : कांद्यावरून शरद पवार-मुख्यमंत्री शिंदे यांच्यात कलगीतुरा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com