gulabrao patil, aayush prasad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil : गुलाबरावांनी मन मोकळं केलं, म्हणाले, आयुष प्रसाद हे एकदिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होतील

Minister Gulabrao Patil On Collector Ayush Prasad : आयुष प्रसाद यांची जळगावहून नाशिक येथे जिल्हाधिकारी पदी नेमणूक झाली आहे. त्यांना निरोप देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

Ganesh Sonawane

Jalgaon News : आयुष प्रसाद यांची आता नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या निरोपाचा व नवनियुक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या स्वागताचा कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री पाटील यांनी माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करत स्तुती सुमने उधळल्याचे पाहायला मिळाले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकसंपर्क अद्वितीय आहेत. ते गोरगरिबांचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवितात. सर्व सामान्यांची कामे करणारा आणि माणसांमध्ये मिसळणारा हा माणूस आहे. अशा अधिकाऱ्यांचा निश्चितच अभिमान आहे, असे गौरवोद्‌गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जळगावमध्ये काम केलेले अनेक जिल्हाधिकारी पुढे राज्याचे मुख्य सचिव झाले आहेत. माझे मन सांगते आयुष प्रसाद हे देखील एक दिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होतील. त्यांची कार्यशैली आणि त्यांनी घेतलेली मेहनत, सर्व राजकीय पक्षांशी असलेले चांगले संबंध, काम करताना मनात कधीच अहंकार न बाळगणे या गोष्टी त्यांना नक्कीच पुढे घेऊन जातील. त्यांनी महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, महापालिका आदी सर्व विभागांना एकत्र आणत 'टीमवर्क'चे उत्तम उदाहरणे निर्माण केल्याचे पाटील म्हणाले.

नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने आयुष प्रसाद यांना जळगावकरांनी निरोप दिला. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, पोलिस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, इंद्रायणी मिश्रा, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे स्वागत करण्यात आले.

कोण आहेत आयुष प्रसाद ?

आयुष प्रसाद हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2015 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नाशिक येथे जिल्हाधिकारीपदी झालेली निवड चर्चेचा विषय झाला. विशेषत : मंत्री गिरीश महाजन यांच्या गुडबुकमधील ते असल्याचे सांगितले जाते. त्यांनी याआधी धाराशिव येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, घोडेगाव (जि. पुणे) येथे आदिवासी विकास विभाागाचे प्रकल्प अधिकारी, अकोला आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. नाशिकला बदली होण्यापूर्वी ते जळगाव चे जिल्हाधिकारी म्हणून काम बघत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT