Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे वजन वाढले; आता जिल्हाधिकारीही जळगावहून आणले, कुंभमेळा आयुक्तपदीही नवा चेहरा

Ayush Prasad is now Collector of Nashik : कुंभमेळा नियोजनाच्या आखाड्यात मंत्री गिरीश महाजन यांचे वजन आता आणखी वाढले आहे. त्यांच्या मर्जितले आयुष प्रसाद आता नाशिकचे कलेक्टर झाले.
Girish Mahajan, Ayush Prasad
Girish Mahajan, Ayush Prasad Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : आगामी कुंभमेळा डोळ्यांसमोर ठेवून नाशिक जिल्हा प्रशासनात फेरबदल करण्यात आले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पिंपरी - चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून आज (ता. 7) रोजी दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कुंभमेळ्याच्या आधीच हा बदल्यांचा मेळा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कुंभमेळा हा नाशिक शहरातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून, त्यासाठी व्यापक नियोजन आणि प्रशासकीय समन्वय आवश्यक असतो. सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन व प्रभावशाली अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्य सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा मंत्री समिती स्थापन केली आहे.

कुंभमेळा मंत्री म्हणून महाजन हे सुरुवातीपासून काम बघत आहेत. कुंभमेळ्याचे नियोजन त्यांनी सुरुवातीपासून एक हाती ठेवलं आहे. अशात प्रशासकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सुद्दा त्यांनी त्यांच्या जळगाव जिल्ह्यातून आणल्याचे बोलले जाते. आयुष प्रसाद हे महाजन यांच्या गुडबूकमधील अधिकारी समजले जातात. त्यामुळे कुंभ आखाड्यातील महाजनांचे वजन आणखी वाढले आहे.

Girish Mahajan, Ayush Prasad
Nashik Collector : शासकीय वाहन दिमतीला तरी नाशिकचे जिल्हाधिकारी निघाले रिक्षातून..
Girish Mahajan, Ayush Prasad
Eknath Shinde : नाशिकच्या 'त्या' आंदोलकांना बघितलं, अन् एकनाथ शिंदेंही आवाक् झाले

कुंभ नियोजनापासून महाजन हे इतर महायुतीतील स्थानिक मंत्र्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचे अनेकदा आरोप झाले. त्यानंतर आता कुठे शिखर समिती व कुंभमेळा मंत्री समितीमध्ये स्थानिक आमदार, खासदार व मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु तरीही या समित्यांवर भाजपचेच वर्चस्व असून मंत्री गिरीश महाजन यांच्याच हातात सारे काही आहे. त्यात आता जिल्हाधिकारी देखील त्यांच्या मर्जितले आल्याने महाजन यांचे वर्चस्व अधिक वाढले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com