Dilip Valse Patil & Babasaheb Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dilip Valse Patil: ‘त्यांची’ पाठपाखण अंगलट, उच्च न्यायालयाने वळसे पाटलांना फटकारले?

Babasaheb Patil; cooperative Minister Dilip Valse Patil responsibility of ndcc bank enquiry case-नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकांकडून वसुलीच्या आदेशाला वळसे पाटील यांनी दिली होती स्थगिती.

Sampat Devgire

Cooperative politics: सरकारी काम आणि सहा महिने थांब हा प्रघात सहकार विभागाने अक्षरशा मोडून तोडून टाकला. सहकारात घोटाळा करा आणि अनेक वर्ष मजा करा, असा प्रघात पडला आहे. त्याला कारण आहे सहकार मंत्र्यांना मिळालेले अधिकार.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सध्या मंत्रिमंडळात नाही. त्यांच्याकडे असलेल्या सहकार खात्याच्या कारभाराचे अनेक नमुने आता पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे सहकार मंत्री वळसे पाटील यांनी कसे काम केले असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध संचालकांकडून वसुलीचे आदेश देण्यात आले होते. सहकार नियम ८८ अन्वये झालेल्या चौकशीत बँकेच्या संचालकांनी संस्थेचे १८८ कोटींचे नुकसान केल्याचे उघड झाले होते. या संदर्भात चौकशी करणाऱ्यांनी ही रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, असे आदेश दिले.

हे आदेश बँकेचे संचालक असलेल्या प्रामुख्याने विविध खासदार, आमदार आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या बाबतीत होते. त्यामुळे यातील काही संचालक सत्तेत तर काही विरोधी पक्षात अशी स्थिती होती. या आदेशावर तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थगिती दिली. मात्र स्थगितीनंतर प्रदीर्घ काळ त्यांनी काहीच केले नाही.

त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या संबंधित बँकेचे नुकसान करणाऱ्या राजकीय नेत्यांना संरक्षण मिळाले. यासंदर्भात बँकेच्या एका सभासदाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात २०२३ मध्ये सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती कायम कशी ठेवली अशी विचारणा केली आहे.

आता याबाबत येत्या ६० दिवसात निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तत्कालीन परिस्थितीत स्थगिती देतात. आता त्यावर विद्यमान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांशी संचालक सत्ताधारी पक्षातच आहेत.

त्यामुळे करून गेले दिलीप वळसे पाटील आणि आता अडचण सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची अशी विचित्र स्थिती झाली आहे. या निमित्ताने उच्च न्यायालयाने दिलीप वळसे पाटील यांच्या तऱ्हेवाहीक कामाकडे देखील अंगुली निर्देश केला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांचे कामकाज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT