Bacchu Kadu Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bacchu Kadu : आता ती वेळ आली ये ; बच्चू कडूंनी दिले मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत, अडीच वर्षांचा शब्द दिल्याचा दावा

Bacchu Kadu On Maharashtra Cabinet Expansion : दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Cabinet Expansion : राज्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता शिवसेना नेते, आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बच्चू कडू यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

दिवाळीत किंवा दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचे मोठे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी अडीच-अडीच वर्षांचा शब्द दिला होता, आता ती वेळ आली आहे असे कडू यांनी म्हटले आहे. आता बच्चू कडू यांनी सांगितलेला हा अडीच-अडीच वर्षांचा फार्म्युला नक्की कोणत्या मुद्यावर आहे, कोणत्या मंत्रिपदाच्या अनुषंगाने आहे, यासंदर्भात राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

बच्चू कडू हे जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातून किशोर आप्पांना मंत्रिपद मिळालेच पाहिजे. हवे तर जिल्ह्यात दोन मंत्रिपदे ठेवा, पण आप्पांना मंत्री करा, असे कडू यांनी म्हटले आहे.

किशोर पाटील हे सलग तीन टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत असून, त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारसंघातील जनतेला त्यांना मंत्रिपद मिळावे असे वाटणे स्वाभाविक असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

किशोर पाटील यांच्या मंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जोर लावणार का, असा प्रश्न विचारला असता, “जर ‘जोर’ या शब्दाला काही किंमत असेल आणि त्या जोरावर मंत्रिपद मिळत असेल, तर आम्ही नक्कीच तो जोर लावू,” असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात राज्यातील सत्ताधारी महायुतीत अंतर्गत घडामोडी वेग घेणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान बच्चू कडू यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पक्षातील सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा पत्ता कट करुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना नारळ मिळणार का? की जुने कारभारीच कायम राहतात हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT