Devendra Fadnavis : CM देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर, आजपासून दुष्काळ दौऱ्यावर; मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

Drought Tour chandrashekhar bawankule : केंद्राच्या मदतीची वाट न पाहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुष्काळ निवारण समिती चंद्रशेखर बावनकुळे याच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.
Dhule Drought
Dhule DroughtSarakarnama
Published on
Updated on

Drought News : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. दरम्यान,मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला.

राज्यातील काही भागातील दुष्काळसदृश परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे आजपासून लातूर, सोलापूर, धारशीवमध्ये जात दुष्काळाची पाहणी करत आढावा घेणार आहेत. मंत्री आणि लोकप्रतिनिधींनाही बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत केली जाईल. तसेच दुष्काळासंदर्भात येत्या शनिवारपर्यंत प्राथमिक अधिसूचना जारी केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील दुष्काळासंदर्भातील प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी गतीने निर्णय घेता यावे, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला मंत्रिमंडळाचेच अधिकार असतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री मकरंद जाधव पाटील आदी मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल या समितीचे सदस्य सचिव असतील.

Dhule Drought
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, 30 सप्टेंबरनंतर परिस्थितीचा आढावा; 5 ऑक्टोबरपर्यंत निर्णय

राज्यभरातून येणाऱ्या माहितीच्या आधारे कोणत्या भागात दुष्काळ आहे, तिथे काय मदत व उपाययोजना करायची, याबाबत ही समिती निर्णय घेईल. बुधवारपासून राज्यात दुष्काळसदृश भागात पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोयाबीन, मका, कापूस आदी पिकांना सर्वाधिक फटका बसला असून कोकणातील भातशेतीवरही दुष्काळाचा विपरीत परिणाम झाला आहे.

मदतीसाठी प्रस्ताव पाठवणार

शेतकऱ्यांना मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडे मदतीबाबतचा प्रस्ताव पाठवणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आगामी 7 ते 8 महिन्यांचे नियोजन केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून हे नियोजन केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मंत्रीही शेतकऱ्यांच्या बांधावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. ते अमरावती, बुलढाणा, अकोला भागाचा दौरा करणार आहेत. त्यांनी आपल्या मंत्र्याना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवसेनेचा मंत्री ग्राऊंड दिसले पाहिजे, त्यांनी जनता दरबार घेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असे ते म्हणाले.

Dhule Drought
Marathwada Drought : कृषिमंत्री दत्ता भरणेंचा हिंगोली दुष्काळ पाहणी दौरा वादात; बार रेस्टॉरंट मालकाच्या शेतात केली पाहणी; प्रश्न विचारताच संतापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com