Achalpur double voters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Achalpur double voters : 'मत चोरी'चा मुद्दा तापलाय, 'स्थानिक'ला कसं समोर जाणार? बच्चू कडूंनी डबल मतदारांचा आकडाच सांगितला

Bachchu Kadu Slams Election Commission & BJP Over Vote Theft Exposes Double Voters in Achalpur : प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी मत चोरीवर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Pradeep Pendhare

Bachchu Kadu Amravati : देशात मत चोरीचा मुद्दा तापला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्वतंत्र समोरं जाणार की, युती किंवा आघाडीकडून लढणार, यावर भाष्य करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपला डिचवलं आहे.

भाजप कार्यालयातून मतदान झालं पाहिजे. मतदान केंद्र सर्व संपवले पाहिजेत. भाजपच्या कार्यालयामध्येच मतपेट्या ठेवून त्यांनीच बटन दाबावं, असा टोला लगावताना, माझ्या मतदारसंघात 13000 नावे डबल सापडल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं.

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार की, युती किंवा आघाडीतून लढणार, यावर भाष्य केले. ते म्हणाले, "लढावं की नाही लढावं, हाच विचार करतोय. मला वाटतं भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे, मतदान केंद्र सर्व संपवले पाहिजे. भाजपच्या कार्यालय मध्येच मत पेट्या ठेवून त्यांनीच बटन दाबावं. आगामी निवडणुकांमध्ये नगरसेवक निवडून आणावे कशाला निवडणुकीचा खर्च करत बसता."

"माझ्या मतदारसंघात 13000 नावे डबल सापडलेली आहेत. लोकशाहीचा पतन करण्याचं काम जर सुरू असेल, तर आम्ही निवडणूक आयोगाला (Election Commission) एक पत्र देणार आहोत. सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयांमध्ये मतदान केंद्र ठेवावं", असा टोला बच्चू कडूंनी लगावला.

भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे बंधू यांनी महापालिका निवडणुका जिंकून दाखवावी, असे आव्हान दिलं आहे. यावर बच्चू कडू म्हणाले, "ईव्हीएम यांचा मित्र झालेला आहे. निवडणूक आयोग तुमचा मित्र झालेला आहे. निवडणूक आयोग मुळे यांना मस्ती आलेली आहे. तुमच्यात धमक असेल जो व्हीव्हीपॅट येतो तो आमच्या हाती द्या, आम्ही त्यावर सिग्नेचर करून मतपेटीत टाकतो, तुमची मर्दानगी असेल, तर हे करून पाहा कोण जिंकतो आहे अन् कोन पैलवान आहे".

'हे साले सगळे 'ईव्हीएम' मशीनचे पैलवान आहेत. चोर भामटे आहेत. आमच्या गावातला जगपटक परवडला हे त्यापेक्षाही नालायक आहेत, असा टोला देखील बच्चू कडूंनी मंत्री महाजन यांना लगावला.

ठाकरे बंधू एकत्र येण्यावर बच्चू कडू यांनी आपल्याला काय करायचं शेतीमालाला भाव नाही. दोन ठाकरे एकत्र आले, उद्धव ठाकरे बीजेपीकडे आले, पवारसाहेब बीजेपीकडे आले, आमच्या शेतकऱ्याचं काय? आमच्या शिक्षणाचा काय? आरोग्याचा काय? मजुरांचं काय? हे दोघे एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली आमचं काय भलं होणार? असे प्रतिप्रश्न केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT