Anil Bonde : अमरावतीमधील बांगलादेशी घुसखोरांमुळे सामाजिक-धार्मिक एकोप्यास धोका; खासदार बोंडेंनी व्यक्त केली मोठी भीती

Bangladeshi Infiltrators Amravati : लोकसभेच्या निवडणुकीत काही बांगलादेशी नागरिकांना मतदान केल्याचा आरोप भाजपच्यावतीने केला जात असताना अमरावती जिल्ह्यात काही बांगलादेशी आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या तक्रारीवरील पोलिसांनी काही बांगलादेशींना अटक केली आहे.
BJP MP Anil Bonde
BJP MP Anil Bonde during an inspection in Amravati’s textile park area, where Bangladeshi workers were allegedly found, sparking security and election concerns.Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News, 16 Aug : लोकसभेच्या निवडणुकीत काही बांगलादेशी नागरिकांना मतदान केल्याचा आरोप भाजपच्यावतीने केला जात असताना अमरावती जिल्ह्यात काही बांगलादेशी आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या तक्रारीवरील पोलिसांनी काही बांगलादेशींना अटक केली आहे.

या घुसखोरांपासून अमरावती जिल्ह्याच्या सामाजिक व धार्मिक एकोप्यास धोका असल्याची भीतीही खासदार बोंडे यांनी व्यक्त केली. अमरावती जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्कमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. रोजगारासाठी अनेक शेजारच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील कामगारांची अमरावती जिल्ह्यात वर्दळ वाढली आहे.

याचा फायदा घेऊन काही बांगलादेशी घुसखोर यात सहभागी झाले आहे. नांदगावपेठ येथील सिटीलैंड आणि बिजीलैंड व्यावसायिक परिसरात अनेक बांगलादेशी कामगार असल्याचे बोलले जात होते. याची माहिती खासदार बोंडे यांना देण्यात आली होती. त्यानुसार बोंडे यांनी या औद्योगिक परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोंची तपासणी केली.

BJP MP Anil Bonde
NCP Politics : सुरज चव्हाणांच्या नियुक्तीमुळे अजितदादांचं टेन्शन वाढणार, तटकरेंच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीतील एक गट नाराज

त्यात त्यांना काही संशयास्पद बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या मदतीने या सर्व संशयित घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक काम करीत असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे. यावर तत्काळ अंकुश लावण्याची गरज आहे.

अन्यथा भविष्यात मोठी सामाजिक व धार्मिक समस्या निर्माण होऊ शकते. हा विषय फक्त अमरावती जिह्यापुरताच मर्यादित नाही. देशालाही भविष्यात यातून धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी तत्काळ घुसखोरांच्या विरोधात मोहीम हाती घ्यावी व त्यांना त्यांच्या देशात हाकलून लावावे अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

BJP MP Anil Bonde
Sanjay Raut politics: ईडी कारवाई... वर्षापूर्वी संजय राऊत म्हणत होते, तेच आता एकनाथ शिंदे यांचे मंत्री का म्हणत आहेत?

लोकसभेच्या निवडणुकीत अवैध मतदानासाठी बांगलादेशी नागरिकांचा वापर करण्यात आला. त्यांना मतदार करून घेण्यात आले होते. याकरिता त्यांना जन्माचे दाखले देण्यात आल्याचा आरोप यापूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी या विरोधात मोहीमच हाती घेतली आहे.

अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांची नावे मतदार यादीत घुसवण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या मोहिमेनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकाळत वाटप करण्यात आलेले जन्माचे दाखले रद्द करण्यात आलेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजप महायुतीच्या विरोधात लागल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी व्होट जिहाद असा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com