Bachchu Kadu On Devendra Fadnavis  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu On Devendra Fadnavis : 'मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात शिर पांडुरंगा ! अन्.. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं भावनिक साकडं

Bachchu Kadu makes an emotional appeal to Lord Vitthal for CM Devendra Fadnavis to announce farmers loan waiver date : आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय पुजा केली.

Ganesh Sonawane

Bachchu Kadu On Devendra Fadnavis : आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय पुजा केली. त्यानंतर राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख समृद्धीसाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी साकडं घातल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही विठूरायाला साकडं घातलं. 'पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात तू जा आणि त्यांच्या कानात कर्जमाफीचं सांग... त्यांच्या तोंडून कर्जमाफीची तारीख जाहीर कर, असं साकडं विठुरायाला आपण घातल्याचं बच्चू कडू म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशी मागणी सध्या करण्यात येत आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर तसेच दिव्यांगांच्या मागण्यांसाठी गेल्या महिन्यात आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले होते. सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन तात्पुरते स्थगित केलं. मात्र आपण आजूनही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं ते म्हणाले.

शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या मनात चांगला विचार येऊ दे, ते नेहमी शहरीकरण शहरीकरण करतात. जपानच्या तंत्रज्ञानावर ते शहराचा विकास करतात आणि इकडे पांदण रस्ते शेतकऱ्यांना जाण्यासाठी नाही. त्यांच्या डोक्यात पांडुरंगा तू जा, पांडुरंगाचा आवतारच फडणवीस साहेब वाटले पाहीजे आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर असं साकडं मी पांडुरंगाला घातलो असं ते म्हणाले.

जोपर्यंत कर्जमाफीची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार असल्याचं ते म्हणाले. तसेच येत्या दोन ऑक्टोबरला मुंबईत मोठा मोर्चा या विषयावर काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे घरावरील सोन्याचे कौल बसवण्यापेक्षा धोरण बदला म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी त्यांना सक्षम करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांसाठी मर्दानगी दाखवत नसून हे नामर्द सरकार आहे. सरकारच्या धोरणामुळेच शेतकरी मरत आहेत. शेतकऱ्यांसाठी 56 इंचाची छाती दिसली पाहिजे. राम मंदिराची स्थापना करुन भाजपला जे पुण्य भेटलं. परंतु बाराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप हे सरकार कुठे फेडणार आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT