
BJP Nashik strategy : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप व शिवसेनेने मिळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खाली करण्याचं काम चालवलं आहे. एक-एक करुन भाजपचे मोठे मासे दोन्ही पक्षांनी आजवर गळाला लावले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष नाशिकमध्ये पूर्णता खिळखिळा झाला आहे. त्यामुळे आता भाजपने आपला मोर्चा कॉंग्रेसकडे वळवला आहे.
नाशिकमध्ये तुलनेने कॉंग्रेसची आधीच फारशी स्थिती काही बरी नाही. त्यातही आता भाजपने कॉंग्रेसचे तीन माजी नगरसेवक गळाला लावले असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. लवकरच तीन्ही माजी नगसेवकांचा भाजपात प्रवेश होईल असेही बोलले जात आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
भाजपने नुकताच कॉंग्रेसचा उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता असलेल्या कुणाल पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं. त्यामुळे धुळे ग्रामीण मतदारसंघासह जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश गाठण्यासाठी विरोधी पक्षातील चांगले चेहरे हेरुन भाजप त्यांना पक्षात प्रवेश देत आहे. त्यामुळे भाजपने नाशिकमध्ये कॉंग्रसचे कोणते नेते गळाला लावले असावे यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. कोणत्याही परिस्थिती महापालिकेत भाजपला पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पोखरुन काढला आहे. गत निवडणुकीत शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील पाच माजी नगरसेवक भाजपात गेले आहेत तर सर्वांधिक २२ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली आहे. तर तीन माजी नगरसेवकांचे निधन झाले आहे. त्यामुळे केवळ पाच माजी नगरसेवक उबाठा त राहिले आहेत. त्यामुळे भाजपने आता कॉंग्रेसवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.
भाजपच्या मनसुब्यांना वेळीच ओळखून पक्षात होणारी संभाव्य गळती रोखण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर असणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसने हालचाली सुरु केल्याची माहिती मिळते आहे. पंरतू कॉंग्रेसला त्यात कितपत यश येतं हे आगामी काळात पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.