Bala Nigal, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bala Nigal Politics: भाजपने सल्ले देऊ नये, सरकारमध्ये आहात, कारवाई करून दाखवावी!

Sampat Devgire

NCP Vs BJP News: भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आणि आमदार देवयानी फरांदे यांनी महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. बदलापूर प्रकरणी विरोधकांचे आरोप त्यांनी खोडले होते.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळा निगळ यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. श्री निगळ म्हणाले, भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. राज्यात त्यांचे सरकार आहे. असे असतानाही ते विरोधकांवर वेगवेगळी टीका करत आहेत.

भाजपचे हे आरोप हास्यास्पद आहेत. भाजपने बोलण्यापेक्षा कृती करावी. दोषींवर कारवाई करावी. कारण ते सत्ते आहेत. सत्तेत असल्याचा त्यांना विसर पडला की काय?. असा विसर पडणे म्हणजे अधिकार गाजवायचा पण जबाबदारी विसरायची असा प्रकार आहे.

भारतीय जनता पक्ष इतरांना सल्ले आणि सूचना देऊ शकत नाही. बदलापूर येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. त्याहीपेक्षा दुर्दैवी त्यानंतर सरकार आणि पोलिसांची वागणूक होती. त्याचा संताप जनतेत आहे.

मंत्री संजय राठोड नावाचे मंत्री या सरकारमध्ये आहेत. त्यांच्यावर कोणते आरोप आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. असे मंत्री ज्या सरकारमध्ये असतील, ते सरकार नैतिकदृष्ट्या महिलांवरील अत्याचाराबाबत काय बोलणार?. काय करणार? हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे निगळ म्हणाले.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि आमदार देवयानी फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत घडलेल्या विविध गुन्ह्यांचा तपशील दिला आहे. हे गुन्हे घडले तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुळे आणि शिवसेनेच्या अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली होती का? अशी विचारणाभाजप नेत्यांनी केली होती.

अशी विचारणा करणे म्हणजे हास्यास्पद आहे. भविष्याकडे पाहून वाटचाल करावयाचे असते. वर्तमान स्थितीवर बोलायचे असते. वर्तमानात भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. हेच सत्य आहे.

इतिहासात काय घडले, यावर काहीही विधाने करणे सोपे असते. त्यामुळे भाजपच्या महिला नेत्यांनी आधी स्वतःच्या पक्षात काय चालले आहे, कोणते नेते पदावर आहेत, मंत्री कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, आहे हे लक्षात घ्यावे.

सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. त्यामध्ये ते महिलांना रोख अनुदान देत आहेत. त्याच्या प्रचार प्रसारावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात आहे. शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. भाजप बहिणीच्या अब्रूची किंमत पैशात करू पाहत आहे. मात्र महिला तसे होऊ देणार नाही.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT