Balasaheb Thorat sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : तो किरकोळ वाद; थोरात म्हणाले, 'बिघाडी कसली...'

Congress and ShivSena UBT dispute: महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वादावार बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जागा वाटपावरून सुरू झालेला वाद काही विकोपाचा नाही.

"आठ ते दहा जागांवर वाद आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. दोन-चार जागांसाठी तिघांचा आग्रह आहे, तर दोन-चार जागांसाठी दोघांचा आग्रह आहे. हा वाद काही एवढा मोठा नाही, दिल्लीतील नेत्यांशी बोलून हा वादावर नक्कीच तोडगा निघेल", असा दावाही आमदार थोरात यांनी केला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला महाराष्ट्रात दाखल झाले असून, या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्या आला आहे. जवळपास 268-270 जागा वाटपांवर तोडगा निघाला आहे. काही जागांवर काँग्रेस (Congress) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये वाद उफळला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना जागा वाटप जमत नसून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीला असल्यास, आम्ही सहभागी होणार नाही, नानांच्या कारभाराविषयी राहुल गांधींशी बोलणार, असा इशारा दिला आहे. नाना पटोले यांनी देखील आक्रमक भूमिका घेत, संजय राऊत हे उद्वव ठाकरेंपेक्षा मोठे नेते असावेत, असा टोला लगावला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा वाद काही मोठा नाही, आणि विकोपाला गेलेला नाही. आम्हाला हव्या असलेल्या दोन-चार जागांवर त्यांचा (शिवसेना ठाकरे पक्ष) दावा आहे. आणि काही दोन-चार जागांवर तिघांचा दावा आहे. त्यातून चर्चा होत आहे. आघाडीत बिघाडी वैगेरे काही नाही. उलट आमच्यात उघड चर्चा होत आहे. इतरांसाखं इथं दबावाखाली चर्चा होत नाही, असे म्हणत महायुतीला बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला.

हा वाद वाढत चालल्याचे पाहून काँग्रेस हायकमांडने दखल घेतली आहे. प्रभारी रमेश चेन्निथला महाराष्ट्रात दाखल झाले असून, ते लवकरच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपाचा तोडगा लवकरात लवकर काढून विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचा आग्रह महाविकास आघाडीकडून केला जात आहे. काँग्रेसचा देखील तसा आग्रह आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि रमेश चेन्निथला यांच्या भेटीत नेमकं काय होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT