Sushma Andhare News : दक्षिण, रामटेकसोबत कामठीसुद्धा द्या; सुषमा अंधारेचा मनाचा मोठेपणा दाखवण्याचा काँग्रेसला सल्ला

Political News : काँग्रेसही एकही जागा द्यायला तयार नसताना उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमच्या वाट्याला कामठी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ आमची आल्यास लढण्याची तयारी असल्याचे सांगितले.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर शहरातील दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच जुपंली आहे. या एका जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांच्या चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे दक्षिण सध्या होल्डवर टाकण्यात आले असल्याचे समजते.

काँग्रेसही एकही जागा द्यायला तयार नसताना उद्धव सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमच्या वाट्याला कामठी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ आमची आल्यास लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणे काँग्रेसनेही मनाचा मोठेपाणा दाखवून दोन मतदारसंघ सोडण्याची मागणी केली.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही रामटेक आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ सोडला होता. येथे आमचा खासदार होता, असे असतानाही उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आम्ही सर्व विसरून प्रचार केला. आमची क्षमता असल्यानेच रामटेक विधानसभा आणि कामठीची मागणी आम्ही करतो आहे. आता काँग्रेसनेही (Congress) मन मोठे करावे. राहूल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी हे समजून घ्यावे.

महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्यासाठी राहूल गांधी यांच्या मोठा चेहरा आहे. तेवढेच महत्त्व उद्धव ठाकरे यांनाही असे सांगून त्यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. आमचे नेते संजय राऊत हे पक्षाचे हिताचे निर्णय घेतात. त्यानुसारच बोलतात. कुठल्याही जागेसाठी ते भांडत नाही. कामठी आमच्यासाठी चांगला विधानसभा मतदारसंघ आहे, याकडेही सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी लक्ष वेधले.

Sushma Andhare
Harshvardhan Patil: 'तुतारी' हाती घेतलेल्या अन् 'आमदार'कीसाठी इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटलांवर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

संजय राऊत, अनिल देसाई हे आमचे नेते आहेत. उद्धव सेनेच्यावतीने ते वाटाघाटी व बोलणी करीत आहेत. माझ्यावर प्रचाराची जबाबदारी आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या यांच्या वक्तव्यावर बोलण्याइतपत मी सिनिअर नाही. मात्र त्यांना लहान बहीण म्हणून त्यांना माझा सल्ला आहे. दोन पाऊल त्यांनी मागे घ्यावे, दोन पावले आम्ही घेतो. किमान बैठकीला उपस्थित राहा. बैठकीतून बाहेर पडाल तर चर्चा कशी होईल, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare
MVA Politics : मविआच्या जागावाटपाचा वाद विकोपाला, ठाकरे गटाने घेतली मोठी भूमिका; 'नाना पटोले बैठकीला असतील तर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com