Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe : दहशतीचं राजकारण केल्यास, 'याद राखा'; थोरातांचा विखेंना इशारा

Balasaheb Thorat warning to Radhakrishna Vikhe on the politics of terror : काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दहशतीच्या राजकारणावर संगमनेरमध्ये चांगलीच टोलेबाजी केली. जिरवा जिरवीच्या राजकारणाला जनता उत्तर दिल त्याचा अभ्यास विखेंनी करावा असा सल्ला देखील थोरात यांनी दिला.

Pradeep Pendhare

Ahmednagar politics News : "अहंकार असलेल्यांना जाग्यावर आणण्याचे काम नगरमधील जनतेने लोकसभा निवडणुकीत केले. दहशतीच्या आणि जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नसल्याचा हा संदेशच आहे. त्याचा आता तरी अभ्यास करावा", असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांना नाव न घेता सुनावले.

काँग्रेसचे (Congress) बाळासाहेब थोरात यांनी आश्वी आणि परिसराची कौतुक करताना दहशत आणि दडपशाही असताना देखील गेली 25 वर्षे सातत्याने मोठं मताधिक्य दिलं. यामुळे आपणही विकास कामांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांची देखील कामे केली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाचे आणि विकासाचे राजकारण केले. मात्र या परिसरामध्ये काहींची मोठी दहशत आहे. विरोधी गावाचा सरपंच असेल, तर अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष या लोकांनी नेऊन ठेवले आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी जिरवाजिरवीचे आणि दमदाट्याचे राजकारण फार काळ चालत नसते, असे सुनावले. "10 वर्ष "गणेश" तुमच्या ताब्यात असताना चांगला चालवता आला नाही. आमच्या भावना आणि उद्देश चांगला म्हणून "गणेश" कारखाना अत्यंत चांगला चालत आहे. मात्र त्यामध्येही अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहे. गोरगरिबांच्या प्रपंचाशी खेळू नका. सत्तेचा गर्व जनता उतरवल्याशिवाय राहत नसते", असा देखील सल्ला थोरात यांनी मंत्री विखेंना दिला.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर जिल्ह्यात विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष निवडणुकीच्या निमित्ताने वाढणार आहे. अलीकडच्या काळात या दोघांचा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वावर वाढलाय. यातून दोघे दिग्गज राजकारणी एकमेकांवर निशाणा साधत आहेत. सध्या तरी संयम राखून एकमेकांची चाचपणी करताना दिसत आहेत. परंतु निवडणूक जशी जवळ येईल, तसे या दोघांमधील संघर्ष तीव्र होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेरच्या अश्वी बुद्रुक येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये माजी आमदार सुधीर तांबे, माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, प्रभावती घोगरे, जयश्री थोरात, रिपब्लिकनचे नेते बाळासाहेब गायकवाड आणि राजेंद्र पिपाडा आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT