Vikhe Patil Vs Thorat : विखे-थोरात यांनी एकमेकांच्या घराण्याचे छंदच काढले

Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat : माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. यावर बाळासाहेब थोरात यांनी टोलेबाजी करतात, मंत्री राधाकृष्ण विखे ही यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
radhakrishna vikhe patil balasaheb thorat
radhakrishna vikhe patil balasaheb thoratsarkarnama
Published on
Updated on

माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात या यांच्यात जुंपल्याचे दिसते.

बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंच्या संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या इच्छावर टोलेबाजी केली. यावर राधाकृष्ण विखे यांनी मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत, असा टोला थोरात यांना लगावला.

बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) संगमनेरमधील आश्वी बुद्रुक इथल्या कार्यक्रमात बोलत सुजय विखे यांच्या इच्छावर टोलेबाजी केली. "माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा विचार व्यक्त केला आहे. मोठ्याच लाडकं लेकरू आहे. त्याचा छंद असेल, तर तो पुरवला पाहिजे. या मताचा मी आहे. पक्षाने नाही, तर पालकांनी छंद पुरवला पाहिजे. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदार संघ या दोन्ही ठिकाणी उभा करा. त्यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल", असा बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला.

radhakrishna vikhe patil balasaheb thorat
Nilesh Lanke On Ram Shinde : 'पवारांचा नाद करू नका, नाहीतर तुमचं राजकीय...' ; खासदार लंकेंचा भाजपच्या शिंदेंना 'मित्रत्वा'चा सल्ला

बाळासाहेब थोरात यांनी लवलेल्या टोल्यावरून सुजय विखे यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna vikhe ) यांनी थोरात यांना चांगलेच सुनावले. "आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत. याबाबत आम्हाला थोरात यांनी शिकवण्याची गरज नाही. तुमच्या घरातील मुलामुलींचा छंद पुरवलेला चालतो. दुसऱ्याच्या मुलाची काळजी का करता?", असा सवाल करत मंत्री विखे यांनी थोरात यांना सुनावले आहे.

radhakrishna vikhe patil balasaheb thorat
Radhakrishna Vikhe Patil News : 'दूध भेसळखोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा' ; मंत्री विखेंचे कडक आदेश, अधिकाऱ्यांनाही ठणकावले!

मंत्री विखे म्हणाले, "थोरात यांनी, तर सर्व घरदार राजकारणात उतरवले आहे. भावापासून ते जावयापर्यंत सर्वच कुटुंब राजकारणात उतरून तुम्ही तुमचे छंद पूर्ण केलेत. सुजय विखे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. संगमनेर तालुक्यात निर्माण झालेल्या हुकूमशहाने तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलाय. ठराविक लोकांचा विकास झाल्याने तालुक्याचे काय झाले आहे, हे जनता रोज अनुभवते. लोकांना आता तिथे नवीन चेहरा हवा आहे आणि तीच भावना लोकांनी आजही व्यक्त करत आहेत. लोकभावनांचा आम्ही आदर करतो. याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवून योग्य तो निर्णय करतील."


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com