Rohit Pawars banner future Chief Minister  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar Future CM News: नगरमध्येही झळकले रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यानंतर आता अहमदनगरमध्येही 'भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बॅनरवर आणि केकवर त्यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवारांचा आज वाढदिवस आहे. मात्र, कर्जत-जामखेडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन-तीन दिवसांपासूनच वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू केले आहे. यात मतदारसंघात 'भावी मुख्यमंत्री' म्हणून रोहित पवारांचे बॅनर्स झळकताच अनेक ठिकाणी वाढदिवसाच्या 'केक'वरही 'भावी मुख्यमंत्री' असे स्टिकर लावत कट करण्यात आले आहेत.

रोहित पवार यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्रिपद सांभाळलेल्या प्रा.राम शिंदे यांच्या समोर कडवे आव्हान उभे करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर रोहित पवार हे कर्जत-जमखेडकर झाले आणि मतदारसंघातील सर्व राजकीय समीकरणं बदलली.

आता रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांनी 'भावी मुख्यमंत्री' असे फ्लेक्स ठिकठिकाणी झळकवले आहेत, तर काही ठिकाणी वाढदिवसाचा केक कापताना त्यावर 'भावी मुख्यमंत्री' असे स्टिकर लावत केक कट करण्यात आले आहेत. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्र आणि मंत्रालयासह लाल दिव्याच्या गाडीची प्रतिकृती केकवर लावण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वीच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरही अशाच पद्धतीने बॅनर झळकले होते. त्यामुळे पुण्यानंतर आता अहमदनगरमध्येही रोहित पवार यांचे 'भावी मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर्स झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT