Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Baramati constituency 2024 : बारामतीतील 'त्या' प्रकाराबाबत भुजबळांनी व्यक्त केली चिंता..!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार मैदानात आहेत. या लढतीकडे राज्यातील सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

बारामती मतदारसंघात खासदार सुळे यांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. त्यांनी गेले महिनाभर प्रचारदेखील केला आहे. मात्र, काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्ह वाटप करताना अपक्ष उमेदवार सोहेल शहा युनूस शहा शेख यांना तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र लिहिण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक निर्णय आयोग काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकाराकडे लक्ष वेधले असता, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी यामध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. हा प्रश्न गंभीर आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने तातडीने दखल घ्यावी. याबाबत निर्णय द्यावा, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.

बारामती (Baramati) मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि बंडखोरी केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात भाग घेतला आहे. त्यासाठी ते ग्रामपंचायतपासून तर विविध संस्थांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सहभागी करण्यासाठी दबाव आणत असल्याच्याही तक्रारी आहेl. या स्थितीत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच अपक्ष उमेदवार शेख यांना तुतारी हे चिन्ह दिल्याने गोंधळात भर पडली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता निवडणूक निर्णय आयोगापर्यंत गेला आहे. यावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT