Parth Pawar Y Plus security : उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना 'वाय प्लस' सिक्युरिटी !

Last four days this security has been given to Parth Pawar : गेल्या चार दिवसांपूर्वी पार्थ पवारांना ही सुरक्षा देण्यात आली असून राजकीय चर्चेला उधाण...
Parth Pawar
Parth PawarSarkarnama

सागर आव्हाड

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे

राज्यामध्ये 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील पोलिस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार इतके मेहरबान का झाले? अशा चर्चांना उधाण आलं आहे. पुणे पोलिस (Police) आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे, असे असताना, राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीव पार्थ पवार यांना थेट वाय प्लस सुरक्षा दिल्याने याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parth Pawar
Lok Sabha Election 2024 : बारामतीत आणखी एका 'तुतारी'ची एन्ट्री; शरद पवारांच्या पक्षाची आयोगाकडे धाव

पार्थ हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ यांनी मावळ (Maval) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. काही दिवसांपूर्वी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, या दोघांना अद्यापही कोणतीही सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी दिलेली नाही. पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघातून महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, तर महाविकास आघाडीने नणंद विरुद्ध भावजयी असा सामना रंगणार आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजितदादा यांनी आपली शक्ती पणाला लावली असून, सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहे. तर सुनेत्रा पवार यांची मुले पार्थ आणि जय हेदेखील आईच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय झाली आहेत.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Parth Pawar
Kolhe Vs Aadhalrao: हिंमत असेल तर या; कोल्हेंचे आढळरावांना खुलं चॅलेंज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com