Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निवडणुकांच्या तयारीवरील फोकस ढळू देऊ नका!

Sampat Devgire

नाशिक : आगामी महापालिका निवडणुका (NMC) चार दिवसांनी होवो की, चार महिन्यांनी निवडणूका जिंकण्यासाठी आवश्यकतेनुसार शिवसेनेच्या (Shivsena) संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्यावे. प्रभागनिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्या.

श्री. राऊत दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या नाशिक शहरातील दौऱ्यात श्री. राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे याही शासकीय आढावा बैठकीच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर होत्या. शिवसेनेच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डॉ. गोरे यांची भेट घेतली.

आगामी महापालिका निवडणुकांची तोंडावर शिवसेनेने नाशिक शहरातील शिवसेनेच्या कोअर कमिटी तयार केली आहे. त्यात, जुन्या- नव्या अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. शुक्रवारी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची श्री. राऊत यांनी बैठक घेत निवडणुकांच्या तयारीवरच फोकस ढळू न देण्याच्या सूचना दिल्या.

फोकस स्थिर ठेवा

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी व त्यासाठी गरजेनुसार बूथ किंवा प्रभाग अंर्तगत संघटनात्मक बदलांचा आढावा घेण्याच्या सूचना श्री. राऊत यांनी दिल्या. निवडणुका केव्हाही लागल्या तरी, निवडणुकांवरच फोकस व तयारी कमी पडणार नाही यासाठी कार्यकर्त्यांवर बूथनिहाय सोपविलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला जावा. कार्यकर्ते सक्रिय राहतील, याची काळजी घेण्यावर बैठकीत सूचनांचा भर होता. बूथनिहाय आणि प्रभागनिहाय आढावा घेत प्रसंगी गरजेनुसार आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी उपनेते सुनील बागूल, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, माजी महानगरप्रमुख जयंत दिंडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, महेश बडवे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT