नीलिमा पवार यांनी `मविप्र` संस्‍थेला उच्च पातळीवर नेले!

हेमंत टकले यांच्या हस्ते नीलिमा पवार यांना नाशिक भूषण पुरस्‍कार प्रदान
Hemant Takle & Nilima Pawar
Hemant Takle & Nilima PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : कुठल्‍याही संस्‍थेच्‍या विस्‍तारासोबत गुणात्‍मक वाढ होणे महत्त्वाचे असते. मविप्र (Maratha vidya prasarak sanstha) संस्‍थेची वाटचाल पाहता विश्‍वविद्यालय होण्याची ताकद या संस्‍थेत निर्माण झालेली आहे. अर्पण करण्याच्‍या भावनेतून सत्‍यशोधक समाजाची (Satyashodhak Samaj) चळवळ उभी राहते. हे मविप्र संस्‍थेने सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, (NCP leader) माजी आमदार हेमंत टकले (Hemant Takle) यांनी शुक्रवारी केले.

Hemant Takle & Nilima Pawar
अमित शहा यांनीच मशिदींवरील भोंगे उतरवण्यात हस्तक्षेप करावा!

महाकवी कालिदास कलामंदिर येथे रोटरी क्‍लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या सरचिटणीस नीलिमा पवार यांना नाशिक भूषण पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले.

Hemant Takle & Nilima Pawar
कोरोनातील विधवा भगिनींना मालमत्तेत मिळणार हक्क!

यावेळी श्री. टकले म्‍हणाले, की नवविश्‍व निर्माण करू शकते, इतकी ताकद स्‍त्रीशक्‍तीमध्ये आहे. मविप्र संस्‍थेची धुरा सांभाळताना अतिउच्च पातळीवर नेण्यात श्रीमती पवार यांनी योगदान दिले आहे. कोरोनाकाळात शिक्षणातील मानवी संबंध हरविलेला आहे. अशा स्‍थितीत ऑनलाइन शिक्षणाच्‍या आजच्‍या जमान्यात दुवा पुन्‍हा जोडणीसाठी प्रयत्‍न होण्याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कुटुंबाकडून बहुमान: पवार

डॉ. वसंतराव पवार यांच्‍या प्रोत्‍साहनातून रोटरी परिवाराशी अनेक वर्षे पूर्वी जोडले गेले. या संस्‍थेमार्फत अनेक चांगले संस्‍कार घडले. वेळेचे महत्त्व, आर्थिक शिस्‍त, सामाजिक कामांसाठी पुढाकार घेण्याची वृत्ती आदी शिकवण या कालावधीत मिळाली. अशात आज होणारा हा सन्‍मान रोटरी कुटुंबाकडून मिळालेला बहुमान आहे, अशी भावना नीलिमा पवार यांनी व्‍यक्‍त केली. सत्‍काराला उत्तर देताना त्‍यांनी मविप्र संस्‍थेच्‍या आजवरचा प्रवासाला उजाळा दिला. संस्‍थेच्‍या विकासासाठी प्रोत्‍साहन व लढ्याला बळ देणारा हा पुरस्‍कार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

याप्रसंगी रोटरी क्‍लब ऑफ नाशिकच्‍या अध्यक्षा डॉ. श्रिया कुलकर्णी, सचिव मंगेश अपशंकर, विनायक देवधर, डॉ. राजेंद्र नेहेते, ॲड. मनीष चिंधडे आदी उपस्‍थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com