Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : ‘या लोकांना माझा इतिहास माहित नाही', त्यावेळी ते शाळेत असतील ; बीडच्या सभेआधीच भुजबळांनी डिवचलं..

Beed OBC rally : बीडमध्ये आज (ता.१७) संध्याकाळी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होणार आहे. दरम्यान, भुजबळांना बीडमध्ये पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.

Ganesh Sonawane

Chhagan Bhujbal : बीडमध्ये आज संध्याकाळी चार वाजता मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभा होत आहे. परंतु जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी भुजबळांना बीडमध्ये पाय ठेऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना इशारा दिला आहे.

2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा काढलेल्या जीआर रद्द करण्याची मागणी या सभेतून छगन भुजबळ करणार आहेत. बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती ही सभा होत आहे. त्यामुळे या महाएल्गार सभेदरम्यान वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा समन्वयक व जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी भुजबळांची सभा उधळवून लावण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान छगन भुजबळांनी नाशिकमध्ये बोलताना जरांगे पाटील व त्यांच्या समर्थकांना मोठा इशारा दिला आहे. भुजबळ म्हणाले, 'या लोकांना छगन भुजबळ यांचा इतिहास माहित नाही' त्यांना मी शिवेसनेत असताना केलेल्या आंदोलनाची कल्पना नाही. शिवसेनेत असताना व शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. शिवसेना सोडल्यानंतर असे अनेकांचे आव्हान छगन भुजबळांनी पचवले आहे. तेव्हा हे सगळे राजकारणात सोडा शाळेत पण नसतील म्हणून अशा वल्गना करत आहेत असा टोला भुजबळांनी लगावला.

जरांगेंच्या लोकांनी ज्या बीडमध्ये हैदोस घातला. आमदारांची घरे, हॉटेल पेटवली त्याच बीडमध्ये आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी महाएल्गार करतो आहे. महाएल्गार सभेला अनेक जण येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. धनंजय मुंडे, गोपिचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मणराव गायकवाड, लक्ष्मण हाके हे देखील मेळाव्याला राहणार असल्याचे भुजबळांनी सांगितले. वेगवेगळ्या संघटना, अनेक समाजाचे प्रतिनिधी आज एकत्रित पाहायला मिळतील असं भुजबळ म्हणाले.

ओबीसी महाएल्गार मेळावा अजित पवार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यावर देखील भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं. भुजबळ म्हणाले हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत नाही. हा महात्मा फुले समता परिषद प्रणित ओबीसी एल्गार आहे. यात राज्यातील ओबीसी नेते एकत्र येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT