Nashik Crime : प्रकाश लोंढे टोळेचे नाशिक पोलिसांना आव्हान, आका जेलमध्ये तरी सातपूरमध्ये रक्ताचा खेळ

Prakash Londhe Gang: खंडणी व सातपूर गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे कोठडीत असतानाही लोंढे टोळीकडून शहरात दहशत पसरवली जात आहे. नाशिक पोलिसांना यातून एकप्रकारे आव्हानच दिले गेले आहे.
Prakash Londhe gang crime
Prakash Londhe gang crimeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : खंडणी व सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआय जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा दीपक लोंढे दोघेही पोलिस कोठडीत आहेत. असे असतानाही लोंढे टोळीची गुंडगिरी मात्र कायम असल्याचे दिसत आहे. लोंढे टोळीने पुन्हा एकदा शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांना आव्हान दिलं आहे.

एका तरुणावर लोंढे टोळीकडून कोयत्याने वार करण्यात आले आहेत. चंद्रकांत विश्वकर्मा नावाच्या युवकाच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न लोंढे टोळीने केला आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक शहरात पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरु असताना घडलेल्या या घटनमुळे खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

नाशिकमधील सातपूर परिसरात ही घटना घडली. चंद्रकांत विश्वकर्मा या युवकावर लोंढेच्या टोळीने अचानक हल्ला केला. त्याच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार केले, त्यानंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, टोळीचा मास्टरमाइंड प्रकाश लोंढे सध्या पोलिसांच्या ताब्यात असूनही झालेला हा हल्ला म्हणजे पोलिसांना दिलेले आव्हान असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु आहे.

Prakash Londhe gang crime
Prakash Londhe Politics: आरपीआय नेता प्रकाश लोंढे याने शोधली होती कमाईची नवी शक्कल, काय आहे प्रकरण?

नाशिक पोलिसांनी एकीकडे 'कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा' ही मोहिम सुरु केली आहे. अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून हे वाक्य वदवून घेतलं जात आहे. प्रकाश लोंढे व दीपक लोंढेकडूनही पोलिसांनी हे वाक्य वदवून घेतलं. मात्र, आका कोठडीत असतानाही लोंढे टोळीची गुंडगिरी कायम असल्याचे दिसत आहे.

Prakash Londhe gang crime
BJP, Eknath Shinde Politics: भाजप, एकनाथ शिंदे यांच्या पडद्यामागे स्वबळाच्या जोर बैठका, महायुतीची शक्यता अधांतरी?

दरम्यान प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे अद्याप फरार आहे. तो सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित असून पोलिस त्याच्या शोधात आहे. तसेच काल पोलिस व महापालिकेने संयुक्त कारवाई करत आयटीआय पुलानजिक असलेल्या प्रकाश लोंढे याच्या अतिक्रमित इमारतीवर बुलडोजर फिरवला व ती इमारत जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, लोंढे टोळीकडून झालेल्या या हल्ल्यानंतर पुन्हा सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता यानंतर पोलिस यावर काय अॅक्शन घेते हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com