Prakash Londhe Controversy: आरपीआय नेता प्रकाश लोंढे याने शोधली होती कमाईची नवी शक्कल, काय आहे प्रकरण?

Prakash Londhe: RPI Leader’s New Earning Trick Exposed: माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या गुन्हेगारीने कांबळे वाडीवर आली संक्रांत, सर्व घरे पाडण्याची नोटीस?
RPI leader Prakash Londhe case
RPI leader Prakash Londhe caseSarkarnama
Published on
Updated on

Prakash Londhe News: महापालिकेने प्रकाश लोंढे यांची अनधिकृत इमारत पाडली. आता येथील कार्यालय देखील पाडण्यात येणार आहे. महापालिकेच्या या कारवाईचा मोठा धसका 'पीएल' टोळीने घेतला.

आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे याचा भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांचीसंपर्क होता. कांबळेवाडी, स्वारबाबानगर येथील मतदानासाठी लोंढे यांच्यावर भाजप नेते स्तुतिशुमने उधळत असत. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर लोंढे गॅंग नाशिक शहराबाहेर पसार झाली आहे. त्यामुळे लोंढे यांच्या विरोधातील कारवाईला कोणीही विरोध करण्याची हिम्मत केली नाही.

स्वरबाबानगर तसेच आयटीआय पुलासह परिसरातील सर्व ठिकाणी लोंढे मार्ग आणि लोंढे नगर असे फलक लावण्यात आले होते. महापालिकेने बांधलेल्या कमानीवर देखील हेच नाव होते. महापालिकेने त्याकडे काना डोळा करून लोंढे यांना सहकार्याचीच भूमिका ठेवली होती. आता हे सर्व फलक हटविण्यात आले आहेत.

RPI leader Prakash Londhe case
BJP, Eknath Shinde Politics: भाजप, एकनाथ शिंदे यांच्या पडद्यामागे स्वबळाच्या जोर बैठका, महायुतीची शक्यता अधांतरी?

आरपीआय नेता प्रकाश लोंढे यांनी सातपूरला चक्क तीन मजली इमारत उभी केली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला. या इमारतीला वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा देण्यात आली. त्याला महापालिका प्रशासनाचा आर्शिवाद होता.

RPI leader Prakash Londhe case
Dr. Apurv Hiray Politics: हिरे कुटुंबीयांची राजकीय संकटे कमी होईनात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा हिरेंच्या विरोधात नवा सर्जीकल स्ट्राईक!

या माध्यमातून माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याने अनधिकृत बांधकामे आणि इमारती बळकावण्याचे सत्र सुरू केले होते. बांधकामांमध्ये उत्तर भारतीय मजूर भाड्याने ठेवले जात होते. माध्यमातून दरमहा कमाईचे मोठे साधन निर्माण झाले.

आता महापालिकेने नंदिनी नदीपात्रातील कांबळेवाडी या लोंढे यांच्या हक्काच्या झोपडपट्टीवर लक्ष केंद्रित केले आहे. या झोपडपट्टीला यापूर्वी अनेकदा नोटीस देण्यात आली होती. नदीपत्रातील ही झोपडपट्टी पूररेषेत येते. आता आगामी एक महिन्यात ती पाडण्याची कारवाई होईल असा दावा महापालिकेने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com