Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News: संजय राऊत म्हणतात, 'सावरकरांच्या भूमीत राहुल गांधींचा सन्मानच होईल'

Sampat Devgire

Shivsena Politics: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे उद्या नाशिकमध्ये आगमन होत आहे. राहुल गांधी यांच्या शहरातील रोड शोदरम्यान शिवसेना कार्यालयासमोर त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सांगितले.latest news maharashtra politics

खासदार राऊत Sanjay Raut यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि त्यावरून भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांकडून होणारी टीका या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला होता. या वेळी राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडाे यात्रेचे स्वागत करणे हे आमचे काम आहे. या यात्रेनंतर काय झाले? किंवा राहुल गांधी यांनी काय विधान केले? याबाबत मला काहीही माहिती नाही. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in nashik

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज निफाड येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार Sharad Pawar यांच्या समवेत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. उद्या राहुल गांधी यांचे नाशिकमध्ये आगमन होत आहे. त्यांची सकाळी चांदवड येथे कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची सभा होणार आहे. या सभेतदेखील मी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या कार्यक्रमांना आमचे पूर्ण सहकार्य आणि सहभाग असेल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक Nashik येथे त्यांच्या रोड शोदरम्यान शिवसेनेच्या Shivsena office शालिमार येथील कार्यालयासमोर राहुल गांधी यांचे भाषण होणार आहे. या वेळी राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात शिवसेना पूर्ण ताकदीने सहभागी होईल. शिवसेना भवनासमोर त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येईल. मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या Bharat Jodo Nyay Yatra समारोपाच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे सहभागी होतील, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या Loksabha Election 2024 पार्श्वभूमीवर आज आणि उद्या नाशिक शहर तसेच जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे विविध राजकीय कार्यक्रम होत आहेत. आज सायंकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत निफाड येथे सभा होईल. उद्या चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे. एकंदरीतच राहुल गांधी Rahul Gandhi , शरद पवार आणि संजय राऊत व्यक्तीने त्यांच्या कार्यक्रमामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने कामाला लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT