Nashik Political News : उमेदवारांकडून लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यासाठी उमेदवार अनोख्या पद्धतीचा उपयोग करतात. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील असाच अनोख्या पद्धतीने प्रचार सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार Bharati Pawar सध्या गावोगावी जाऊन प्रचार फेरी काढत आहेत. यापूर्वीच्या प्रचाराचा अनुभव घेऊन त्या अतिशय अनोख्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांचा हा प्रचार मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.
वणी येथे त्यांनी शनिवारी प्रचार केला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. खंडेराव मंदिरात पूजा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत प्रचार फेरी काढली. यावेळी नागरिकांच्या गाठीभेटी झाल्या. त्याचा समारोप छोट्या सभेने झाला. यावेळी डॉ. पवार यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या योजनांची मांडणी केली.
यावेळी डॉ. पवार म्हणाल्या, मी तुमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचा निरोप घेऊन आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की, आगामी काळात शेतकरी आणि कामगारांसाठी अतिशय चांगल्या योजना राबविल्या जाणार आहेत. गरिबांच्या कल्याणाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. एक गरिबांचा मुलगा पंतप्रधान झाला तर, केंद्र शासनाच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचतात. त्याचा अनुभव २०१४ नंतर देशातील जनतेला झाला आहे. याचा विचार करून मतदान करावे, असा पंतप्रधान मोदी यांचा निरोप आहे.
या मतदारसंघात अडीच लाख गरिबांना घरी मिळाली आहेत. 2.40 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ झाला आहे. दहा हजाराहून अधिक महिलांना उज्वला गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. अशा अनेक योजना आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अकराव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी सगळ्यांनी राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करून भारतीय जनता पक्षाला मतदान करावे. महायुतीचे सर्व घटक पक्ष यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे अतिशय मोठी राजकीय ताकद उभी राहिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ Narhari Zirwal, माजी आमदार धनराज महाले, भाऊलाल तांबडे, सुनील बच्छाव, प्रवीण बोरा, मनोज ढिकले, संपतराव घडवजे, सुनील ढोमणे यांसह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.