Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray Sabha : शिवसैनिकांच्या मनातील 'ती' प्रबळ इच्छा 18 वर्षांनंतर पूर्ण होणार

Shrikant Shinde, Naresh Mhaske : राज यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे नरेश मस्के यांच्यासाठी कळव्यातील खारेगाव येथे प्रचारसभा होणार आहे.

Thane Political News : शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरे यांनी आपला मनसे हा वेगळा पक्ष स्थापन केला. त्यानंतर शिवसैनिकांना राज यांची कायमच उणीव जाणवत आल्याचे बोलले जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे शिवसैनिकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण करून देते. आता जवळजवळ 18 वर्षानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी राज यांची रविवारी (ता. 12) तोफ धडाडणार आहे. यातून कित्येक शिवसैनिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.

आता लोकसभा निवडणुकीनिमित्त राज (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यातून महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंच्या सभांचे आयोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने राज यांची कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे नरेश मस्के यांच्यासाठी कळव्यातील खारेगाव येथे प्रचारसभा होणार आहे.

मनसे आमदार राजू पाटील Raju Patil म्हणाले, 18 वर्षानंतर राज ठाकरे हे धनुष्यबाण आणि शिवसेना या पक्षासाठी त्या स्टेजवर उभे असतील. आमच्यासारख्या अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की राज यांना प्रत्यक्ष त्या स्टेजवर बघायला कधी मिळेल? मनसे कार्यकर्ते म्हणून आम्हाला राज ठाकरेंचे मार्गदर्शन कायम लाभते. परंतु अनेक शिवसैनिक असे आहेत, त्यांना राजसाहेब यांचे भाषण त्यांच्या स्टेजवर ऐकण्याची इच्छा होती. त्यांची ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. त्या अनुषंगाने तेही जोरात कामाला लागले आहेत, असेही पाटलांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Dhule Congress : ऐन लोकसभेत धुळ्यात काँग्रेसला धक्का; प्रदेश सरचिटणीस झाल्यानंतर दोन दिवसांतच तुषार शेवाळे भाजपवासी

राज यांची पंतप्रधान मोदी Narendra Modi यांनी स्तुती केलेली आहे. चांगल्या कामाची स्तुती करायला काही हरकत नाही. आणि त्यांनी स्तुती यासाठी केली की निस्वार्थीपणे पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. कोणतीही मागणी न करता, देशाच्या विकासासाठी दिला. येथे दहा वर्षाच्या कालावधी समोर कोणतेही नेतृत्व नसताना देशावर प्रयोग करणे परवडणार नाही. त्या अनुषंगाने विकासासाठी मोदींना राज यांनी पाठिंबा दिला असून तो प्रामाणिकपणे आहे, असेही राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Raj Thackeray
Loksabha Election : प्रचाराची रणधुमाळी थांबली, उमेदवारांची पावले देवाच्या दारी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com