Manoj Jarange : लाठीचार्जचे आदेश देणाऱ्याचं नाव घ्या, मग...; मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना ओपन चॅलेंज

Devendra Fadnavis : माझ्या पोलिसांवर हल्ला केल्याचे तुम्हीच म्हणाले होतात. आता जनता तुमची की पोलिस तुमचे? तुम्हाला राजगादीवर जनतेने बसवले की पोलिसांनी? असे सवालही जरांगेंनी फडणवीसांना उद्देशून उपस्थित केले.
Manoj Jarange, Devendra Fadnavis
Manoj Jarange, Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Political News : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे तीन टप्पे पार पडेपर्यंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मौन बाळगल्याचे दिसून आले. आता मात्र चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ते सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. लाठीचार्जचे आदेश देणाऱ्याचे नाव घ्या, असे खुले आव्हानच जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना दिले आहे.

मनोज जरांगेंनी Manoj Jarange मराठा आंदोलकांवर लाठीचार्जबाबत सरकारमधून टोलवाटोलवी केली जात आहे. यावरून त्यांनी फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न जरांगेंनी केला आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी सांगावे की अंतरवाली सराटीतील आंदोलकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हल्ला करायला लावला. कंट्रोल माझ्या हातात नव्हता. त्यांच्या हातात होता म्हणून. उद्यापासून विषय सोडून देतो, त्यांचे नाव घेणे बंद करतो.

राज्य तुम्ही चालवता. तुम्हाला फोडाफोडी करायला जमते. आमच्या आई-बहिणीवर हल्ला केला, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी Eknath Shinde नाही तर फडणवीसांनी स्टेटमेंट केले होते. माझ्या पोलिसांवर हल्ला केल्याचे तुम्हीच म्हणाले होतात. आता जनता तुमची की पोलिस तुमचे? तुम्हाला राजगादीवर जनतेने बसवले की पोलिसांनी? असे खडे सवालही जरांगेंनी फडणवीसांना उद्देशून उपस्थित केले आहेत.

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Raj Thackeray Sabha : शिवसैनिकांच्या मनातील 'ती' प्रबळ इच्छा 18 वर्षांनंतर पूर्ण होणार

मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेतो असे म्हणाले फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले होते, पण घेतले नाहीत, उलट ते वाढले आहेत. राज्यातील गुन्ह्यांचा आकडा लाखांवर गेला आहे. आम्ही मुंबईला गेलो, त्यावेळी जेसीबीने स्वागत करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोपही जरांगेंनी केला आहे. मग त्यावेळीच का गुन्हे दाखल केले नाहीत, आता का करत आहात, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंनी Pankaja Munde केलेल्या आरोपांनाही यावेळी उत्तर देले आहे. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांना पाडा, असे मी सांगितले नाही. तसे सांगितले, तर ओबीसी मतदानही मुंडेंच्या विरोधात जाईल. त्यामुळे जास्त नाटके करू नका. भाजप आणि महायुतीला पाडा, असे मी बोललोच नाही. फक्त मराठ्यांनी एक गठ्ठा मतदान करायचे आणि असे पाडायचे की पाच पिढ्यानंतर निवडणुकीला कुणी उभे राहिले नाही पाहिजे, असे जरांगेंनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Dhule Congress : ऐन लोकसभेत धुळ्यात काँग्रेसला धक्का; प्रदेश सरचिटणीस झाल्यानंतर दोन दिवसांतच तुषार शेवाळे भाजपवासी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com