NCP Politics News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक बुधवारी मुंबईत झाली. या बैठकीत पक्षाच्या खासदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून संपर्क करण्यात आल्याची चर्चा आहे. या चर्चेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी याबाबतच्या चर्चा फेटाळल्या आहेत. ते म्हणाले, एक महिन्यापूर्वी अजित पवार पक्षाच्या नेत्या आहोत. असे सांगत एका महिलेने माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मी त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. त्यांना टाळले. त्यांना कोणताही प्रतिसाद मी दिला नाही. या संदर्भात संबंधितांना देखील कळविले आहे
महाराष्ट्रात सध्या वेगळे राजकीय वातावरण आहे. विविध महत्त्वाचे प्रश्न राज्य शासनाला अडचणीत आणत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठीच त्या पक्षाचे नेते अशा चर्चा पसरवीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी याबाबत काल वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांबाबत त्यांनी वेगळ्याच प्रश्न उपस्थित केला. त्यावर खासदार भगरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केिली आहे.
अमोल मिटकरी यांना काहीच कामधंदे दिसत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणत आहेत. त्यांना स्वतःला चर्चेत राहण्याचा आटापिटा ते करीत असतात. त्यामुळेच ते असे निरर्थक वक्तव्य करीत असावेत. त्यांना आम्ही काहीही किंमत देत नाही, या शब्दात फटकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि सुप्रिया ताई सुळे आहेत. आम्हाला कोणतेही मार्गदर्शन घ्यायचे असल्यास आम्ही त्यांच्याकडे जाऊ. ते सांगतील तोच आमच्यासाठी अंतिम शब्द असेल. त्यामुळे अन्य काही विचार करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. या शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी सध्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. काल यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक झाली. आज राज्यातील निवडक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक काही माध्यमांकडून वेगळी चर्चा घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.