Amit Shah Politics: ‘ व्होट जिहाद’च्या दिल्लीवारीला सुरतने लावला सुरूंग अन् गृहमंत्र्यांची मालेगावकडे पाठ!

Amit Shaha; Why was Amit Shah's visit cancelled... Stomach Jihad and BJP-भारतीय जनता पक्षाकडून गेले काही दिवस मालेगाव शहराला वोट जिहाद म्हणून टार्गेट करण्यात आले आहे.
Amit Shaha
Amit ShahaSarkarnama
Published on
Updated on

BJP Malegaon News: विधानसभा निवडणुकीत मालेगावला टार्गेट करण्यात आले. होते यामध्ये लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान कारण ठरले. भारतीय जनता पक्षाला निवडणुका नसल्या तरी देशातील राजकारणासाठी हा मुद्दा चर्चेत ठेवायचा आहे का अशी चर्चा आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (ता.१२) मालेगाव दौऱ्यावर येणार अशी एक बातमी शुक्रवारी प्रसारित झाली. किरीट सोमय्या यांच्या बहुचर्चीत दौऱ्यापाठोपाठ हा दौरा होता. मात्र काही वेळातच शहा यांचा तो दौरा रद्द झाल्याची बातमीही आली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हा दौरा आला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Amit Shaha
Chhagan Bhujbal : भुजबळांनी पाण्याच्या विषयावर दाबली भाजपची दुखरी नस... काय आहे राजकारण!

भारतीय जनता पक्षाचे एक दिवसीय शिबिर शिर्डी येथे होत आहे. या शिबिराचा समारोप भाजप नेते आणि गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीत होणार होता. तत्पूर्वी शिर्डीला जाताना अमित शहा मालेगावला येणार अशी बातमी होती.

Amit Shaha
Dada Bhuse : प्रचंड बहुमत, तरी आयारामांच्या स्वागताला सज्ज! सत्ताधारी पक्षाचा आत्मविश्वास डळमळीत?

केंद्रीय गृहमंत्री शहा आणि मालेगाव यांचा दौरा अनेकांना आश्चर्य वाटण्यास कारणीभूत ठरला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत मात्र त्यामुळे उत्साह होता. हा दौरा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होता का? अशीही चर्चा सुरू झाली.

लोकसभा निवडणुकीत मालेगाव शहरातून दोन ते तीन अल्पसंख्यांक समाजाचे उमेदवार असतात. या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवारी अर्ज बाद झाला. ‘एमआयएम’ने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. परिणामी एकही अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार नसल्याने मालेगाव शहरातील मतदारांना काँग्रेस हा एकमेव पर्याय वाटत होता. सर्वच पक्षांनी त्यासाठी काम केल्याने मालेगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव सुमारे दोन लाख मते मिळाली होती. त्यामुळे त्या विजयी झाल्या.

भारतीय जनता पक्षाला हा पराभव अतिशय जिव्हारी लागला होता. त्यांनी त्याचा राजकीय लाभ उठविला मालेगावमध्ये झालेल्या मतदानाला वोट जिहाद म्हणून विधानसभा निवडणुकीत सगळीकडे प्रचारीत करण्यात आले. यातून मतदारांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. हा मुद्दा सहजासहजी सोडण्याची भाजपची इच्छा नाही. किंबहुना आता हा मुद्दा देशभर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

या निमित्ताने देशाचे व समाजाचे मूळ प्रश्न बाजूला राहून धार्मिक ध्रुवीकरण याकडे मतदारांना आकर्षित करता येते. यासंदर्भात समाज माध्यमांवरील प्रचार देखील जोरात आहे. त्यामुळेच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना मालेगावच्या दौरा करावासा वाटला तर नाही ना? अशी राजकीय चर्चा आहे.

त्यामुळेच निवडणुका दिल्लीच्या आणि दौरा मालेगावला अशी भाजपची व्युहरचना तर नसावी ना?. त्यात तथ्य वाटावे अशी राजकीय स्थिती देखील सध्या आहे. कारण भाजपचे नेते किरीट सोमय्या. यांनी नुकताच दोन वेळा मालेगाव शहराचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी मालेगाव मध्ये शंभर कोटी रुपये साठी आले होते, असा दावा केला.

त्याला स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती यांनी तेव्हढेच कडक आव्हान दिले. जे पैसे आले, ते गुजरातशी संबंधीत आहेत. मालेगावला सुताचे विणकाम होते. सुरत शहराला ते कापड पाठवले जाते, हा तो संबंध असावा. ज्यांच्या खात्यात आले ते नदी पलिकडचे आहे. हवे तर सीबीआय, ईडी कडूनही चौकशी करा. मात्र मालेगावची बदनामी थांबवा, असा इशारा त्यांनी दिला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com