Girish Mahajan Statement About Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेला गोव्यात कुत्रं देखील ओळखत नाही!

आमदार निलंबनाविषयी न्यायालयाच्या निकालाचे पडसाद

Sampat Devgire

जळगाव : विधीमंडळ सभागृहाच्या बाहेर जो वाद झाला त्यामुळे बारा आमदारांचे निलंबन केले होते. हा निर्णय सूडबुद्धीने केलेला होता. त्याला आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चपराक दिली आहे, असे प्रतिपादन भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. (Girish Mahajan Statement About Shivsena)

विधान मंडळाच्या सभापतींच्या दालनात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी प्रभारी सभापती भास्करराव जाधव यांच्या दालनात त्यांच्याशी असभ्य वर्तन केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्याबाबत असभ्य वर्तन करणाऱ्या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले होते. यावर श्री. महाजन यांनी प्रतिक्रीया दिली. (Girish Mahajan News)

ते म्हणाले, विधानसभेचे प्रभारी सभापती भास्कर जाधव स्वतःला सुप्रीम कोर्टाच्या वर समजतात. हा प्रकार घडला तेव्हा त्यांनी संयम दाखवला असता तर तसा प्रसंग घडला नसता. या संदर्भात आलेल्या प्रतिक्रीयांचा विचार करता, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या बाजूने जर निर्णय झाला तर त्याचे स्वागत आणि झाला नाही तर ते टीका करतात. या सरकारला त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही, म्हणून हे निलंबन केले, असा आरोप देखील श्री. महाजन यांनी केला.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार घाबरले आहे. सरकार स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व करत आहे. त्यामुळेच भीतीने त्यांनी बारा आमदारांचे वर्षभराचे निलंबन केले. याआधी असे कुणी केले नव्हते. तुम्हाला लोकशाहीची पायमल्ली करून चालणार नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सर्व बाबतीत आतापर्यत न्यायालयाने यांच्या बाजूने निर्णय दिला नाही. मुख्यमंत्री दोन वर्षे झालेत घरात बसले आहेत. राज्यात वाऱ्यावरची वरात सुरू आहे.

गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही आता किराणा दुकानात देखील वाईन विक्री सुरू केली. सर्वाना लायसन्स देऊन स्वतःचे खिसे गरम करत आहेत. आम्ही म्हणतो पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा पण ते कमी करणार नाही. इतके महत्वाचे प्रश्न असताना त्यावर निर्णय घेत नाहीत. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आले की, शिवसेनेला गोव्यात कुत्र देखील ओळखत नाही हे स्पष्ट होईल.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT