महापौरांसह मालेगावच्या २८ नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये दाखल!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
Ajit Pawar In NCP party Office programme
Ajit Pawar In NCP party Office programmeSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : मालेगावच्या (Malegaon) विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकचा केलेला विकास सर्वांसमोर आहे. या भागातील जनतेने विविध क्षेत्रांत विकासकामे पहिली आहेत. आगामी काळात मालेगाव शहर श्री. भुजबळ व माजी आमदार आसिफ शेख (Ex MLA Asif Shaikh) यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास साधतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार व जनाधार व्यापक होईल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी मुंबई येथे व्यक्त केला.

Ajit Pawar In NCP party Office programme
Collector : सरकारी नोकरीत सामावून घ्या, म्हणत त्याने जिल्हाधिकाऱ्यांनाच दिली धमकी..

शहर विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून, मालेगाव शहरातील येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शहरातील २८ नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी श्री. पवार, व श्री. भुजबळ बोलत होते. जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, युवकाध्यक्ष मेहबूब शेख, माजी खासदार समीर भुजबळ, मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख, शिवाजी गर्जे, माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख, नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Ajit Pawar In NCP party Office programme
Aditya Thackeray : खाम नदीपात्राच्या शेजारी औरंगाबादकर अभ्यास, भोजन करतांना पहायचेत..

श्री. पवार म्हणाले, की पक्षप्रवेशामुळे तुमचा भ्रमनिरास होणार नाही. पक्ष व शासन पातळीवर पूर्णत: सहकार्य करू. पक्षवाढीसाठी आपण जोमाने काम कराल याची खात्री आहे. श्री. भुजबळ म्हणाले, की मालेगाव असेल किंवा नाशिक त्या भागाचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. या भागासाठी लागणारा निधी तातडीने मंजूर केला जाईल. अल्पसंख्याक समुदायाचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विभागामार्फत लागणारी सर्व मदत आपणास केली जाईल. आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मालेगाव मध्ये मजबूत होत आहे. त्यामुळे पक्ष विस्तारासाठी आणखी जोमाने आपण देखील काम कराल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मनपाचे सभागृह नेते अस्लम अन्सारी, स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, नंदकुमार सावंत, विठ्ठल बर्वे, सलीम अन्वर, मंगला भामरे, नजिर अहमद, मोहम्मद कमरून्नीसा रिजवान, फकीर मोहम्मद शेख, जैबून्नीसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, हमीदाबी शेख जब्बार, रजिया बेगम अब्दुल मजीद, अब्दुल अजीज सत्तार, शेख रजियाबी इस्माईल, निहाल अहमद सुलेमान, फारूक खान फैजूल्ला, नुरजहाँ मोहम्मद मुस्तफा, सलीमाबी सैय्यद सलीम आदींसह २८ नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

राज्यात काँग्रेसचा सफाया होत असताना शहरात आम्ही कॉंग्रेसची सत्ता आबाधित ठेवली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आमच्याकडे लक्ष देत होते. सध्या पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करीत आहेत. नाना पटोले यांनी दोन वेळा वेळ दिली. मात्र ते आले नाहीत.

- रशीद शेख, माजी आमदार तथा माजी महापौर, मालेगाव

---

काँग्रेसने भ्रमनिरास केला. शहर विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ वेळोवेळी सहकार्य करीत होते. सर्वानुमते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला.

- ताहेरा शेख, महापौर, मालेगाव मनपा

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com