Bhaskarrao Bhagare  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhaskarrao Bhagare : दिल्लीतल्या चर्चा पुरे, आता कृती करा! कांदा पॅकेजवरून खासदार भगरे आक्रमक; कृषीमंत्री शिवराज चौहानांकडे केली मागणी

Onion Farmers News : चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. बैठकीला चार दिवस होऊनही केंद्र सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही.

Sampat Devgire

Nashik News : केंद्रीय कृषी आणि पणन संचालकांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नावर दिल्लीत बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील विविध नेते आणि खासदार उपस्थित होते. या बैठकीची सत्ताधारी पक्षाकडून भरपूर चर्चा झाली.

या बैठकीत नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्र शासनाच्या यंत्रणांमार्फत कांदा खरेदी करून बफर स्टॉक वाढविणे. कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे, भावांतर भरपाई योजना, विशेष आर्थिक पॅकेज आणि अतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करणे हे महत्त्वाचे विषय बैठकीत होते. दीर्घकालीन राष्ट्रीय कांदा धोरण तयार करणे या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

बैठकीतील विषयांबाबत केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कार्यवाहीचे संकेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र बैठकीनंतर या संदर्भात अतिशय संथ गतीने कांदा खरेदी प्रक्रिया सुरू आहे. जाहीर करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत ही खरेदी अत्यल्प आहे. त्यात अत्यंत किचकट अटी व तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी वाढत आहे.

नाशिकसह राज्यातील कांदा उत्पादकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या विविध मंत्र्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे केंद्र शासनाने दिल्लीत झालेल्या बैठकीत कांदा उत्पादकांच्या निर्णयांवर तातडीने कार्यवाही सुरू करावी. कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्याबाबत प्रशासनाला तातडीने सूचना कराव्यात अशी मागणी खासदार भगरे यांनी केली.

यासंदर्भात भास्कर भगरे यांनी पत्र लिहिले आहे. राज्यातील कांदा उत्पादकांची स्थिती भाव गडगडल्याने अत्यंत दयनीय आहे. शेतकरी याबाबत राज्य आणि केंद्रातील सरकारकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने तातडीने दिलासा द्यावा.

सध्या केंद्र शासनाकडून कांद्याच्या बियाण्यावर प्रक्रिया करून निर्यात केली जाते. मोठ्या प्रमाणावर बियाणे निर्यात होत असल्यामुळे अन्य देशांमध्ये कांदा लागवड वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या निर्यातीमुळे भारतीय कांद्याला मागणी कमी होऊ लागली आहे. पार्श्वभूमीवर निर्यातक्षम कांदा बियाण्यावर लावण्यात यावा. मुळे देशातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे खासदार भगरे म्हणाले.

कांदा प्रश्न सध्या तीव्र बनला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे या प्रश्नावर उद्या सोलापूर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. नाशिक पुणे आणि सोलापूर यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. याची सरकारने दखल घ्यावी, अन्यथा त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असे खासदार भगरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT