Shinde and Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde News : नाशिकमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दिलासा

Nashik Municipal Corporation News : नाशिक शहरात शिवसेना आणि ठाकरे गटात अनेक कारणांवरुन रस्सीखेच सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nashik : राज्यातील सत्तांतरांनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातून सध्या विस्तव देखील जात नाही. या दोन्ही गटाच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरु असल्याचंही चित्रही कायम पाहायला मिळते. याचवेळी शिंदे गटाकडून वारंवार ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहे. तसेच मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या कार्यालयावरही शिवसेने(शिंदे गट) नं ताबा घेतला होता.

याचदरम्यान, नाशिक शहरात शिवसेना आणि ठाकरे गटात अनेक कारणांवरुन रस्सीखेच सुरु आहे. नाशिक मनपाच्या कर्मचारी युनियनच्या कार्यालयाचा ताबा मिळण्यावरुन दोन्ही गटात वाद उफाळून आला होता. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने शिंदे गटा(Shinde Group)ला मोठा धक्का देतानाच ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या(Nashik) कर्मचारी सेनेचे दालन ताब्यात घेण्यावरून नाशिकमध्ये शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात वाद सुरू होता. तर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या दालनाचा ताबा घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले होते. यात तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या आदेशाने पोलिसांनी हे कार्यालय सिल केले होते.

ठाकरे गटाने याविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना पोलिस प्रशासनाला बेकायदेशीर केलेली ऑर्डर माघार घेण्यास सांगितले. पोलीस प्रशासनाने दोन दिवसांची वेळ मागून घेतली आणि मंगळवारी (दि. २७) न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने निकाल झाला. उच्च न्यायालय मुंबई येथे महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यातर्फे ॲड. यशोदीप देशमुख, ॲड. वैदेही प्रदीप आणि ॲड. गजानन तेलंग्रे यांनी कामकाज पाहिले.

उच्च न्यायालयानं(High Court) अखेर मंगळवारी (दि.२७) नाशिक महापालिकेतील कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे देण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महापालिकेच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदावरुन ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू होता. शिवसेना नगरसेवक आणि कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बंटी तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटा(Thackeray Group)चे महानगरप्रमुख यांनी युनियनच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला होता, त्यातून बरंच नाट्य रंगलं होतं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर याबाबत महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे.

नाशिक मनपाच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्षपदावरून दोन्ही गटात कलगीतुरा रंगला होता. दोन्ही गटाकडून अध्यक्षपदावर दावा करण्यात आला होता. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. नाशिक म्युनिसीपल कर्मचारी सेनेच्या कार्यालय अध्यक्षपदी सुधाकर बडगुजरच राहतील, असा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी देखील अध्यक्षपदावर दावा ठोकला होता. मात्र न्यायालयाने निर्णय दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT