Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama

Aaditya Thackeray Breaking News : मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीस्वार धडकला; शिवसेना भवनासमोर नेमकं काय घडलं..?

Aaditya Thackeray Accident News : आदित्य ठाकरे यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला उजव्या बाजूनं वळण घेत होता.
Published on

Mumbai : माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसेना भवनला येत होते. त्यांचा ताफा शिवसेना भवनासमोरच आला असतानाच एक दुचाकीस्वार पाठामागून येत ठाकरेंच्या गाडीला भरधाव वेगाने धडकला. यानंतर अंगरक्षकांसह पोलिसांची एकच धावपळ उडाली. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला वळण घेत होता. यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक दिली. या धडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

Aaditya Thackeray
Bagde-Kale News : काळे तुम्ही ज्या बंगल्यात राहता, तो वडीलांनी बाजार समितीचे चेअरमन असतांना बांधला...

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे. शिवसेना भवना(Shivsena Bhavan)समोर ही घटना घडली आहे. दुचाकीस्वार हा गाडीला धडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी ठाकरे यांच्या अंगरक्षकांनी त्या बाईकस्वाराला पकडलं. नंतर पोलिसांकडून या दुचाकीस्वाराची चौकशी सुरु आहे.

नेमकं काय घडलं...?

आदित्य ठाकरे यांचा ताफा शिवसेना भवनच्या दिशेला उजव्या बाजूनं वळण घेत होता. यासाठी त्यांच्या ताफ्याची गती कमी देखील झाली होती. पण दुचाकीस्वार पाठून भरधाव वेगाने आला. त्याने पुढे न बघता दुचाकी पुढे नेली. त्यानंतर ठाकरेंची गाडी पुढे होती. यावेळी बाईकस्वाराने ब्रेक दाबला. पण तोपर्यंत गाडीला त्याची गाडी धडकली.(Latest Marathi News)

Aaditya Thackeray
Saayoni Ghosh ED News: बंगाली अभिनेत्री, तृणमूल नेत्या ED च्या रडारवर; शिक्षक भरतीशी कनेक्शन

यावेळी बाईकस्वार स्वत: दुचाकीवरुन पडताना वाचला. त्यानंतर लगेच आदित्य ठाकरे अंगरक्षक आणि पोलीस तिथे दाखल झाले. सुदैवाने कोणतंही नुकसान झालं नाही. ही घटना नॉर्मल होती असं आदित्य ठाकरे यांनी घटनेवरुन सांगितलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com