NCP News
NCP News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rashtrawadi Vardhapan Din: मोठी बातमी! राष्ट्रवादीचा अहमदनगर येथील 9 जूनचा मेळावा स्थगित

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन येत्या 10 जूनला आहे. यानिमित्ताने नऊ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यासाठी मोठी तयारीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणे सुरू होती. मात्र, नगर शहरातील 9 जूनला होणारा मेळावा स्थगित करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार तसेच पदाधिकारी या मेळाव्यासाठी झटत होते. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नऊ तारखेच्या दरम्यान नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या माहितीनुसार नगर शहरात होणारा पक्षाचा मेळावा स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विविध विषयांसाठी झालेल्या बैठकीत नगर इथे होणारा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याचे नगर जिल्ह्यातील पक्षाचे जेष्ठनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

9 जून रोजी नगर येथे होणारा राष्ट्रवादीचा मेळावा स्थगित झाला असला तरी पक्षाचा मेळावा लवकरच घेण्यात येणार असून तो साधारण 20 जून या तारखेच्या दरम्यान मान्सून पावसाची परिस्थिती पाहून ठरवला जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर अहमदनगर की इतर ठिकाणी या बाबतीतही बदल होऊ शकतो, अशी एकंदरीत परिस्थिती असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर पुढील मेळाव्याची तारीख आणि ठिकाण अंतिम केलं जाईल, असं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा मेळावा मुंबईत घेण्यात येऊ शकतो, यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही नगरमध्ये होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्याच्या तारखेच्या बदलाबाबत पक्ष पातळीवर चर्चा सुरू असल्याचं बोलले आहेत.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT