Nashik ACB News: लाचखोर सुनिता धनगरचा डाव पुन्हा फसला: बँक खात्यात लाखोंची माया

Sunita Dhangar News: महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्याकडे सापडलेल्या मालमत्तेने डोळे विस्फारले आहे.
Sunita Dhangar
Sunita Dhangar Sarkarnama

Nashik ACB News : बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या बँकेच्या खात्यात ३० लाख १६ हजार ६२० रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. सदरील बँक खाते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केले आहे. तसेच, धनगर यांच्या पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी एका दिवसाने वाढला आहे. दरम्यान, प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत, त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासण्याअंती त्यांना दाखल न केल्याने त्यांचा ‘डाव’ फसला. (Court sanctions one day police custody to Sunita Dhangar in bribery case)

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर (Sunita Dhangar) यांच्याकडे सापडलेल्या मालमत्तेने डोळे विस्फारले आहे. याबाबत पोलिस देखील आणखी काय काय मिळेल याचा सखोल तपास करीत आहे. धनगर यांच्यारडे सापडलेली रोकड, मालमत्ता पाहचा सबंध शिक्षण विभाग लाचखोरीच्या किती आहारी गेला आहे आणि कोण कोण किती गाळात रूतले आहेत, याची चर्चा सुरु आहे. याबाबत कायद्यातील तरतुदी अतिशय फोल असल्याने लवकरच धनगर यांना जामीन मिळून त्या पुन्हा लाचखोरीच्या कामाला नव्या दमाने लागणार अशी चर्चा सुरु होती.

Sunita Dhangar
Nagpur ZP News : ‘५० खोके...’ नंतर जिल्हा परिषदेत गाजत आहे ‘१५ टक्के, एकदम ओक्के...’

नाशिकरोड परिसरातील एका शाळेच्या बडतर्फ मुख्याध्यापकाच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २) महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजार रुपयांची तर, कनिष्ठ लिपिक नितीन जोशी यास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. लाचखोर धनगर यांच्या घरझडतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हाती ८५ लाख रुपयांची रोकड, ३२ तोळे सोने आणि दोन फ्लॅटसह प्लॉटची कागदपत्रे असा सुमारे पाच ते साडेपाच कोटींची मालमत्ता सापडली होती. (Nashik News)

दरम्यान, धनगर यांच्या बँक खात्यांसंदर्भातील माहिती पथकाने संकलित केली होती परंतु दोन दिवस सुट्ट्यांनंतर आज पथकाने बँकांमध्ये पोहोचून त्यांच्या खात्यांवरील रक्कमेचा शोध घेतला. यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चार बँक खाते आणि जिल्हा बँक अशा पाच खात्यांवर एकूण ३० लाख १६ हजार ६२० रुपये असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे धनगर यांच्याकडून पथकाच्या हाती रोख स्वरुपातील १ कोटी १५ लाख १६ हजार ६२० रुपयांची रोकडच लागली आहे. (Political News)

Sunita Dhangar
Madhya Pradesh Election 2023: 'आरएसएस'च्या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार येणार; काँग्रेसचा दावा

धनगर यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. मंगळवारी (ता. ६) श्रीमती धनगर यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.

लाचखोर धनगर यांची ‘माया’

* घरझडतीत सापडलेली रोकड : ८५ लाख रुपये

* बँक खात्यातील रक्कम : ३० लाख १६ हजार ६२० रुपये

* सोने : ३२ तोळे

* आडगाव शिवारात प्लॉट

* उंटवाडीतील राहता फ्लॅट व टिळकवाडीतील एक आलिशान फ्लॅट : सुमारे अडीच कोटी रुपये

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com