BJP MLA Akshay Kardile Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dheerajsinh Rajput murder : ‘गजाआड नको, मुंडकी छाटली पाहिजेत’; धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरणी भाजप आमदाराचा संताप

BJP MLA Akshay Kardile makes a strong statement over Dheerajsinh Rajput murder in Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये धीरजसिंह यांच्या मृत्यूनंतर संतापाचे वातावरण; सर्व आरोपींसह कथित मास्टरमाईंडला पकडण्याची भाजप आमदारांची मागणी

Pradeep Pendhare

Ahilyanagar news : हिंदुत्ववादी कार्यकर्ता तथा महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

आरोपींना केवळ गजाआड करण्याऐवजी त्यांची मुंडकी छाटली पाहिजेत, असे संतप्त विधान कर्डिले यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुकुंदनगर परिसरात कामावर असताना धीरजसिंह राजपूत यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केली असून, इतर आरोपींचा तसेच कथित मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

धीरजसिंह यांच्या मृत्यूनंतर अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी (Hindu) संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यांच्या निषेधार्थ शहर बंद ठेवण्यात आले होते. तसेच आज शहरासह जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही चर्चेत आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार अक्षय कर्डिले यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करताना आक्रमक शब्दांचा वापर केला. “लोकांची मागणी आहे की, त्यांना गजाआड करा. माझी तर मागणी आहे की, पकडल्याबरोबर त्यांची मुंडके छाटून टाकायला पाहिजे,” असे कर्डिले म्हणाले.

धीरजसिंह हे मुकुंदनगर परिसरात काम करण्यास फारसे इच्छुक नव्हते, मात्र जबाबदारी म्हणून ते तेथे गेले होते, असा दावा कर्डिले यांनी केला. काही लोकांनी त्यांच्याविरोधात कट रचून त्यांचा जीव घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्डिले यांनी या प्रकरणात “मास्टरमाईंड कोण आहे, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली. काही आरोपी दोन दिवसांत हैदराबादला पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

धीरजसिंह याच्या कुटुंबासमोर मोठी लढाई

दरम्यान, पोलिस तपासात हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी आणि या हल्ल्यामागील कथित सूत्रधाराचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. “धीरजसिंह यांना न्याय मिळाला पाहिजे. ही लढाई मोठी आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत,” असेही आमदार कर्डिले यांनी म्हटले.

युवा आमदाराच्या आक्रमक शैलीची चर्चा

आमदार कर्डिले हे दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र असून, त्यांच्या संयमी राजकीय भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डिले यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे थेट आणि आक्रमक भाषा वापरल्याने त्यांच्या विधानाची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT