Devayani Farande Nashik Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devayani Farande Politics : आमदार फरांदे संतप्त; महापालिकेनं मलमपट्टी थांबवावी अन् रस्त्यावर उतरावं!

BJP MLA Devayani Farande aggressively demands that officials inspect roads and get contractors to repair them: नाशिक शहरातील रस्त्यांची निकृष्ट कामे करून शहराला लुटणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा, अशा सूचना भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिल्या आहेत.

Sampat Devgire

Devayani Farande demands better road repairs: नाशिक शहराच्या नागरिकांची रस्त्यातील खड्ड्यांमधून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. दररोज होणाऱ्या अपघातांनी नागरिक व्यथित आहेत. राजकीय पक्षांनी इशारा देऊनही महापालिका ढिम्म आहे.

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुसऱ्यांदा शहरात पहाणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांचीही भेट घेतली. या भेटीत नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजाविषयी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. विशेषता बारा बंगला परिसरात सर्व रस्ते अत्यंत दयनीय बनले आहेत.

आमदार फरांदे (Devayani Farande) यांनी दुसऱ्यांदा शहराच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत विविध भागात दौरा केला. यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने ऑनलाइन तक्रारींची मोहीम चालवली होती. अनेक नागरिकांनी देखील तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी दौरा करून महापालिका आयुक्तांना खड्डे कायमस्वरूपी दुरुस्त करण्याची सूचना करणार असल्याचे सांगितले.

नाशिक (Nashik) शहरात आमदार फरांदे यांनी दौरा केल्यावर खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात सर्व खड्डे पूर्वीसारखेच झाले आहेत. मुरूम टाकून खड्डे बुजविले जात असल्याने काही तासात खड्डे पुन्हा पूर्वस्थितीत होतात. त्यामुळे तत्पुरती डाग ड्युटी नको ही आपली भूमिका असल्याचे फरांदे म्हणाल्या.

शहरातील रस्त्यांची गुणवत्ता पूर्ण कामे झाली पाहिजेत ही सगळ्यांची अपेक्षा आहे. त्या कंत्राटदारांनी कामे केली ती रस्ते तीन वर्ष देखभालीची जबाबदारी असते. अशा कंत्राटदारांकडून तातडीने रस्ते दुरुस्त करून घ्यावेत. यामध्ये दोषी असणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.

या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून कामे करू नये. त्यातून प्रश्न सुटण्याची चिन्हे नाहीत. आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून खड्डे पहावेत आणि ते बुजवून घ्यावेत. गुणवत्ता नियंत्रण विभागाने या खड्ड्यांची तपासणी करून तांत्रिक क्षमता आणि अन्य अहवाल द्यावेत.

महापालिका आयुक्तांनी आमदार फरांदे यांच्या भेटीनंतर खड्ड्यांवर होणारा खर्च नियंत्रणात आणला होता. बोगस कामांची बिले थांबविली होती अशी चर्चा होती. मात्र या स्थितीमुळे शहरातील परिस्थिती बदललेली नाही. खड्डे असल्याने रोज शहरात आठ ते दहा गंभीर अपघात होतात. त्यामुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावीच लागेल अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT