Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Politics: निवडणूक निरीक्षकांच्या अनुप अग्रवाल, कुणाल पाटील यांच्या नियुक्तीतून धुळ्यात भाजपने गिरवला काँग्रेसचा कित्ता, गटबाजीला नेताच ठेवला नाही...

BJP-Dhule-Municiple-Council-Kunal-Patil-and-Anup-Agrawal-will-be-the-Incharge-for-election-Groupism-finish-काँग्रेसमधून आलेले माजी आमदार कुणाल पाटील ग्रामीणला तर आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर सोपवली धुळे शहराची जबाबदारी

Sampat Devgire

Dhule BJP News: सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे दोन गट हा धुळ्याच्या राजकारणाचा अपरिहार्य भाग राहिला आहे. त्यामुळे नेत्यांच्या नियुक्त्या करताना त्याचा मेळ साधण्याचे कसब पक्षाला दाखवावे लागले. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून भाजपने हाच कित्ता कायम ठेवला आहे.

नगपालिका निवडणुकांसाठी भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांत निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या पक्षात आधीच इच्छूक आणि नेत्यांची गर्दी आहे. धुळे जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी त्यात समन्वय आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

पालकमंत्री रावल यांच्याकडे धुळ्याच्या चार नगरपालिकांच्या निवडणुकांची सुत्रे आहेत. त्यात ग्रामीण भागासाठी माजी आमदार आणि नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले कुणाल पाटील यांच्यावर जबाबदारी आली आहे. शहरासाठी आमदार अनुप अग्रवाल यांची नियुक्ती झाली.

धुळ्यात चार नगपालिकांच्या निवडणुका होत आहे. तीथे भाजपाचीच सत्ता होती. शिरपूरची सर्व सुत्रे आमदार अमरीशभाई पटेल यांच्याकडे आहेत. त्यात इतरांचा हस्तक्षेप नसेल. दोंडाईचा नगपालिका पालकमंत्री जकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली आहे.

नव्याने नगपंचायत झालेली पिंपळनेर आणि शिंदखेडा या नगपालिकेत भाजपला विरोधकांचे आव्हान मिळू शकते. त्यामुळे आमदार कुणाल पाटील आणि माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याबरोबरच हर्षवर्धन दहिते आणि चंद्रकांत पाटील हे दोन नेते अर्थात त्यांचे गट आहेत. या गटांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला.

धुळ्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सत्ताधारी पक्षात दोन गट राहिले आहे. काँग्रेसच्या प्रभावकाळात देखील अँकर (अमरीशभाई पटेल) आणि जवाहर (पाटील) हे गट होते. त्यांचे समर्थक प्रत्येक तालुक्यात कार्यरत होते. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या नियुक्तीतून जुने आणि नव्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे.

ही भविष्यातील राजकारणाची चाहूल देखील आहे. आमदार पाटील यांनी काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी नाकारली. विधानसभेला त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. पाटील भविष्यातील पुर्नवसन कसे होणार, या दृष्टीने पाटील यांच्या नियुक्तीकडे पाहिले जाते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT