Ajit Pawar Politics: इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांना 'दादाचा वादा' ... म्हणाले, तुमच्यासाठी दिल्लीला जाईल!

Ajit Pawar promises support to India Security Press employees: उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, दादा, दिलेला शब्द पाळतो..! ;गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न सोडवतो.
Deputy CM Ajit Pawar on Nashik labor issues
Deputy CM Ajit Pawar on Nashik labor issuesSarkarnama
Published on
Updated on

India Security Press Nashik employee protest news: शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे. दिल्लीच्या सरकारमध्येही त्यांच्या शब्दाला मान आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आता मात्र हवा बदलू लागली आहे की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे. सिक्युरिटी प्रेसचे कर्मचारी नेते आपल्या विविध प्रश्नांसाठी शरद पवार यांच्या संपर्कात असत. शरद पवार यांच्या प्रयत्नाने प्रेसचे अनेक प्रश्न देखील आजवर मार्गी लागले आहेत.

मात्र राजकारणातले बदलते वारे पाहून अनेकदा गंमत घडते. असेच काहीसे इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या नेत्यांबाबत दिसू लागले आहे. सिक्युरिटी प्रेस च्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी या नेत्यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गाठले.

Deputy CM Ajit Pawar on Nashik labor issues
Nitesh Rane Politics: कुंभमेळ्यात मुस्लिमांची दुकाने हवी कशाला? राणेंचा मुस्लिम विरोध पुन्हा उफाळला; भाजपला मतदान करत नसल्याचा आरोप

इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया या उंचावल्या आहेत. अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. केंद्र शासनाची अथवा राष्ट्रीय प्रश्नांबाबत त्यांना किती महत्त्व असेल हा वादाचा विषय आहे.

Deputy CM Ajit Pawar on Nashik labor issues
Maharashtra Politics : वंचितमध्ये भूकंप ! कुणाच्या कारभाराला कंटाळून २०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले?

मात्र यासंदर्भात सिक्युरिटी प्रेस च्या काही नेत्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. इंडिया सेक्युरिटी प्रेस च्या कर्मचाऱ्यांच्या वेतन, वारस नियुक्ती आणि अन्य आर्थिक प्रश्नांबाबत त्यांनी निवेदन दिले. या निवेदनावर अजित पवार यांनी त्यांना सविस्तर माहिती लिहून कळवा, असा प्रतिसाद दिला.

इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र पवार यांच्यासमवेत वरळी डोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन टिळे यांच्यासमवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे गार्‍हाणे मांडले.

यावेळी अजित पवार यांनी आपल्या या नेत्यांना सांगितले की, तुमच्या समस्या मुद्देसूद माझ्याकडे द्या, त्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच दिल्लीत भेट घेऊन तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवेन असा शब्द झालेल्या बैठकीत दिला. यावेळी अर्जुन टिळे, डॉ. जाकीर शेख, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंदरे, जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com