BJP corporator Poonam Dhangar with Uddhav Thackray
BJP corporator Poonam Dhangar with Uddhav Thackray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेकडून भाजपचा अचुक लक्ष्यभेद...माजी नगरसेविका पुनम धनगर शिवसेनेत!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक प्रविण तिदमे (Bunty Tidme) दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) दाखल झाले होते. शिंदे गट त्याचा आनंद साजरा करीत असतानाच शिवसेनेने त्याची भरपाई चक्क शिंदे गटाचे सहकारी भाजपकडून (BJP) वसुल केली आहे. आज भाजपच्या माजी नगरसेविका पुनम धनगर (Poonam Dhangar) यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. (Shivsena take Political compensation of Shinde group from it`s colligue BJP In nashik)

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाने राजकीय धक्का देत शिवसेनेच्या बंटी तिदमे यांचा वाजत गाजत प्रवेश घडवून आणला होता. गेल्या अडीच महिन्यांपासून राजकीय धक्यावर धक्के सहन करत असलेल्या शिवसेनेला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला शिवसेनेचे संधी आज मिळाली. भाजपच्या माजी नगरसेविका पुनम धनगर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेला आज छोटेसे यश मिळाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. मराठा व ओबीसी आरक्षणावरून निवडणुका लांबल्या यादरम्यान शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. नाशिक शहरात भाजपचे बाराहून अधिक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. नाशिक रोड भागातील काही नगरसेवक तसेच विशाल संगमनेरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत होते.

भाजपचे काही माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे जवळपास निश्चित झाले होते मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे सरकार स्थापन झाले. त्यामुळे शिवसेनेत जाणारा फ्लो आटला. उलट शिंदे गट स्थापन झाल्यामुळे शिवसेनेत असलेली दुसऱ्या क्रमांकाची फळी फुटून शिंदे गटात सहभागी होत आहे. त्यामुळे शिवसेनेत भरती पेक्षा ओहोटी लागल्याचे दिसत आहे. दरम्यान आज पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक एक च्या भाजपच्या नगरसेविका पुनम धनगर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेच्या पदरात एन ओहोटीच्या काळात यश पदरात पडल्याचे मानले जात आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आदी यावेळी उपस्थित होते.

पक्षाच्या वरिष्ठांकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने पक्षाला सोडचिट्टी दिली.

- पूनम धनगर, माजी नगरसेविका.

...

भारतीय जनता पक्षातून अनेकांना शिवसेनेत यायचे आहेत धनगर यांच्या पासून सुरुवात झाली आहे.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख- शिवसेना.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT