NCP News: भामरेंकडून भातकळकरांची खिल्ली, त्यांच्या मेंदूचा खळ झाला आहे!

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांचा खरपुस समाचार घेतला.
Atul Bhatkhalkar & Anita Bhamre
Atul Bhatkhalkar & Anita BhamreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पत्राचाळ (Patrachawl case) प्रकरणी आरोप करणे याचाच अर्थ आमदार भातकळकरांच्या (MLA Atul Bhatkhalkar) मेंदूचा खळ झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (NCP Women wing) शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (NCP Women wing`s Anita Bhamre criticised BJP Spoaksperson Bhatkhalkar)

Atul Bhatkhalkar & Anita Bhamre
“महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरातला देणे, हाच शिंदे सरकारचा कार्यक्रम”

त्या म्हणाल्या, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात एक केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांचा उल्लेख आल्याने भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांची केवळ इंग्रजी वृत्तपत्राचा आधार घेत चौकशी करावी असे ट्विट करून चौकशीची मागणी केली आहे.

Atul Bhatkhalkar & Anita Bhamre
Eknath Shinde: `होय आम्ही कंत्राट घेतले आहे`

वास्तविक पाहता ईडीने कुठेही शरद पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. भाजप मधील नेत्यांना उठसूठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोप करून पक्षाची व नेत्यांची बदनामी करणे एवढेच काम आहे. आता शिवसेनेशी गद्दारी करून सत्ता मिळवली आहे तर जनतेची कामे करा. राज्यातील महत्वाचा वेदांत-फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला का गेला यावर विचारमंथन करा. वाढती महागाई, बेरोजगारी कमी करून सामान्य जनतेला न्याय द्या.

किमान भविष्यात तरी महाराष्ट्रात चांगले उद्योग आणून युवकांच्या हाताला काम कसे मिळेल याचे नियोजन करा. कांदीवली पूर्व मतदार संघातील जनतेने ज्या उद्देशाने आ अतुल भातखळकरांना निवडून दिले ते सोडून दिवसभर विरोधी पक्षातील नेत्यांवर ट्विट करणे बंद करा अन्यथा भविष्यात भाजपचा आयटी सेल सांभाळण्या शिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही असा सल्ला देखील शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी दिला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com