Sujay Vikhe on Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe on Jayant Patil : 'होम प्रोडक्शन'मध्ये हिरोला करमेना, जयंत पाटील 'सुपरहिट'च्या शोधात; सुजय विखेंनी एका दगडात दोन पक्षी मारले

BJP former MP Sujay Vikhe Sharad Pawar NCP Jayant Patil defection : जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या हालचालीवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहे. जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही, असे म्हणून या चर्चांना अधिकच हवा दिली. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील काल शरद पवार यांच्याबरोबर होते.

जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे राज्याच्या राजकारणात पडलेला प्रश्न असतानाच, भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शरद पवार यांच्याबरोबर जयंत पाटील यांना डिवचंत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. भाजपशी (BJP) त्यांची जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा अलीकडच्या काळात संपर्क वाढला आहे.

यावरून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील जयंत पाटलांचा माझी काही गॅरंटी नाही, हे विधान म्हणजे, शरद पवारांना (Sharad Pawar) सूचक असा इशारा आहे, असे म्हटले होते. आता त्यांचेच पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी जयंत पाटील यांचा इशारा लवकर वास्तविकतेमध्ये रूपांतर होणार असल्याचे विधान केले आहे. याशिवाय सुजय विखे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील निशाणा साधला.

सुजय विखे म्हणाले, "तो घरातला पक्ष आहे. म्हणजेच 'होम प्रोडक्शन' आहे. त्यात शरद पवार, त्यांची कन्या सुप्रिया सुळे, नातू रोहित पवार आणि त्यांचे मानलेले पुत्र जितेंद्र आव्हाड यांचंच ते 'होम प्रोडक्शन' आहे. या 'होम प्रोडक्शन'मध्ये पिक्चर कायमच फ्लॉप होतो आहे. त्यामुळे तिथला मेन ॲक्टर (जयंत पाटील) म्हणतो मी माझ्या नावावर 'फ्लॉप पिक्चर' का लावून घ्यावा?"

'फ्लॉप पिक्चर' द्यायचा नाही म्हणून, मेन ॲक्टरने एखाद्या दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जावं का? त्यामुळे सुपरहिट पिक्चर देता येईल, अशा दृष्टिकोनातून हिरो विचार करू शकतो. असं म्हणताना जयंत पाटील दुसरे प्रोडक्शन हाऊस म्हणजे भाजपची निवड करतील, असे संकेत सुजय विखे यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT