Sunil Shinde
Sunil Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunil Shinde; ज्याला भ्रष्टाचारी म्हणता ते तर भाजपकडे गेलेत!

Sampat Devgire

नाशिक : मुंबईकर (Mumbai) नागरिक आणि शिवसेनेला (Shivsena) कितीही त्रास द्या, मुंबईकर सुज्ञ आहे. यापुर्वीही केंद्राने (Centre Government) 1983 मध्ये असाच अन्याय केला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुंबईकरांनी शिवसेनेच्याच नगरसेवकांना निवडून दिले. यंदाही तुम्ही काहीही करा. मुंबईकर पुन्हा शिवसेनेचाच महापौर करतील, असे आमदार सुनिल शिंदे (Sunil Shinde) म्हणाले. (Present Government is applying Anti Mumbai Agenda)

भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी मांडलेला नियम 260 अन्वये माडंलेला प्रस्ताव हा स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा व मुंबईकरांना अडचणीत आणण्याचा प्रकार अधिक आहे. याबाबत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप खरे तर भाजपने स्वतःकडे चार बोटे आहेत, याचा विसर पडू नये, असे शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, यापूर्वीचा इतिहास पाहिल्यावर 1983 मध्ये केंद्र सरकारने महापालिका बरखास्त केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जनतेने 1985 मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना मोठ्या संख्येने निवडून दिले. आपली नाराजी व्यक्त केली. तसेच यंदा पुन्हा मुंबईकर नागरिक आम्हाला भरभरून मते देतील व शिवसेनेचा महापौर होईल.

ते पुढे म्हणाले, आपण सर्व सातत्याने भ्रष्टाचार, भ्रष्टाचार म्हणत आहात. 2006 मध्ये (कै) अटल बिहारी वाजयेपी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वचननाम्यात आहे. जेव्हा हे लोक आरोप करतात, तेव्हा या नेत्यांना हे लोक विसरले. जेव्हा आरोप करता तेव्हा तुम्ही देखील त्यात तेव्हढेच सहभागी होते हे विसरले का?

मुंबई महापालिकेच्या 2012 मध्ये निवडणुकीत भाजपचे गोपिनाथ मुंडे, नितीन गडकरी यांचे फोटे वचननाम्यात आहेत. तेव्हाही लोकांनी शिवसेनेला निवडून दिले. हे आरोप करणारे विसरले की काय?. महापालिका स्थायी समितीने तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप केला. स्थायी समिती सर्व आर्थिक व्यावहार पाहते. तीचे सभापतीच आता भाजपमध्ये गेले आहेत. मग त्यांना काय आपण निरमा पावडर लावली की काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले. त्यांनी घोषणा केली व 212 रस्त्यांची घोषणा केली, ती सर्व कामे यापूर्वीच मंजुर होती. तसे नसेल तर सांगा. आपण त्यात दहा टक्के रक्कम कंत्राटदारांना आगाऊ दिले. जे कंत्राटदार आले, त्यांना मुंबईत काम करण्याचा अनुभव नाही,ते कसे काम करणार, एकाच वेळी सर्व कामे त्यांनी सुरु केले तर वाहतूक व्यवस्थेचे काय, लोकांनी काय लोकल ट्रेनने प्रवास करायचा काय. मुंबईकरांना होणारा हा त्रास थांबवला पाहिजे. नियमाबाहेर जाऊन घेतलेले निर्णय व कामांचा फेरविचार केला पाहिजे.

आमदार शिंदे यांनी प्रदुषण वाढते आहे याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, शहरात धुळीचा मोठा प्रश्न आहे. जेव्हा 212 रस्त्यांचे कामे एकाच वेळी सुरु होईल तेव्हा नव्या समस्या उभ्या राहतील. सध्या 1730 कोटींचे सुशिभिकरणाचे प्रस्ताव आहेत. पथदीप, शोभेचे वीजेचे दिवे व फर्नीचर यामध्ये चीनी वीजेच्या लाईटस्ची तोरणे गुंडाळण्यात येत आहेत. त्यावर प्रती मीटर सहाशे ते सातशे रुपये खर्च केले आहेत. इथेच दुकाने आहेत, दराची चौकशी करा, ते शंभर रुपयांना मिळतात. तीथे सातशे रुपये मोजलेत. त्याची चौकशी करणार का हा आमचा प्रश्न आहे. ते आम्ही निर्दशनास आणले.

ते म्हणाले, 2017 पर्यंत शिवसेनेने मुंबई महापालिका नफ्यात होती. आता त्या ठेवींतील पंधरा हजार कोटींच्या ठेवी काढल्या आहेत. प्रशासक या शहराचा आर्थिक डोलारा बिघडवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ते थांबवा आणि लवकरात लवकर निवडणुका घ्या.

मुंबई महापालिकेत एमआयएस शाळा सुरु केल्या. त्यावर सत्ताधारी पक्षाने टिका करीत भ्रष्टाचाराचा आरोप सत्ताधाऱ्यांना केला. मात्र या शाळांमध्ये आज एका जागेसाठी अनेक विद्यार्थी अर्ज करतात. त्यांची गुणवत्ता उत्तम आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 97 ते 98 टक्के लागतो. 3.04 लाख मुले महापालिका शाळांत शिकतात. या शाळांत तेव्हढीच स्पर्धा आहे. आज उत्तरे मिळतात की पटसंख्या वाढली आहे. बुट, नाश्ता, दप्तर, इमारती या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत, त्याचे श्रेय शिवसेनेचे आहे. ते तर मान्य करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT