Abdul Sattar News: बांधावर गेलेल्या सत्तारांचे मदतीबाबत तोंडावर मात्र बोट!

Abdul Sattar at Dhule: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी धुळ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
Abdul Sattar at Dhule
Abdul Sattar at DhuleSarkarnama
Published on
Updated on

Dhule News: वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील (Dhule) असंख्य शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मंगळवारी रात्री धुळ्यात दाखल झाले. गुढीपाडवा असूनही त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, मात्र मदतीविषयी त्यांनी आश्वासन देण्यास नकार दिला. (Agriculture Minister Abdul Sattar visit unseasonal rain affected farms)

आनंदखेडे (ता. धुळे) शिवारातील नुकसानग्रस्त भागाची कृषिमंत्री सत्तार यांनी पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. साक्री तालुक्यातही काही ठिकाणी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा करण्यास त्यांनी नकार दिला, याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे सांगितले.

Abdul Sattar at Dhule
Shocking News: `राष्ट्रवादी`च्या शहराध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल!

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. जिल्ह्यातील पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शनिवारी मुख्यमंत्री शिंदे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत घोषणा करतील.

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आत्महत्या केल्याचा आरोप झाला आहे. त्याबाबत कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की वीज कंपनीच्या जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्याला जीव गमवावा लागला असेल, तर संबंधितांवर कारवाईची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करेन.

Abdul Sattar at Dhule
APMC Politics: शिंदेंची शिवसेना बाजार समितीच्या रिंगणात?

कृषिमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, अधिकारी वर्ग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, जिल्हाप्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख विजय अग्रवाल, महानगरप्रमुख संजय वाल्हे, बाळू आगलावे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com