Jalgaon Police Station Fight Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Police Station Fight : पोलिस ठाणं बनलं अखाडा! भाजप माजी नगरसेवक अन् युवकांचा तुफान राडा

A heated clash broke out between a BJP former corporator and a group of youths inside Jalgaon Shanipeth Police Station, leading to chaos in front of the police : भाजपच्या माजी नगरसेवक आणि युवकांच्या गटात जळगाव इथल्या शनीपेठ पोलिस ठाण्यात तुफान मारामारी झाली.

Pradeep Pendhare

Jalgaon political clash news : जळगाव शहरातील शनी पेठ पोलिस ठाण्यात भाजपचा माजी नगरसेवकांचा गट आणि युवकांच्या गटात तुफान राडा झाला. पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या रूमध्येच हा राडा झाला. नेमकं कोण-कोणाला मारत होत, हेच कळत नव्हतं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं, पुढचा अनर्थ टळला.

परंतु या प्रकरणी गुन्ह्याची नोंद घेण्याचं काम सुरू होतं. मात्र या राड्याची जळगावच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. या दोन्ही गटातील वादाला महापालिकेच्या निवडणुकीची किनार असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू होतं.

जळगाव (Jalgaon) इथल्या वाल्मिक नगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा समोरच्या युवकांच्या गटाशी जोरदार वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी माजी नगरसेवक शनी पेठ पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. माजी नगरसेवकाबरोबर यावेळी पाच-सहा कार्यकर्ते होते.

वाल्मिक नगरमध्ये झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकांच्या गटातील दोन ते तीन जणांना, या माजी नगरसेवकांनी मारहाण सुरू केली. यानंतर युवकांच्या गटातील काही जण आक्रमक झाले अन् ते पोलिस (Police) ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या रुममध्ये घुसले.

तिथं माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह असलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. दोन्ही गटांमध्ये रुममध्येच राडा सुरू झाला. आरडा-ओरडा सुरू झाला. यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी देखील रूमकडे धाव घेतली.

रूममध्ये दोन्ही गट आक्रमक होते. कोण-कोणाला मारत होते, हेच कळत नव्हते. दोन्ही बाजूने मारामारी सुरू असताना, पोलिसांनी हस्तक्षेप करत, दोन्ही गटावर नियंत्रण मिळवलं. दोन्ही गटातील मारहाण करणाऱ्यांना वेगळ करण्यात आलं.

भाजपच्या माजी नगरसेवकाला व त्याच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस वाहनात बसून दुसरीकडे हलवले. या मारामारीची वार्त वाऱ्यासारखी जळगावच्या शनी पेठेत पसरली. व्यापारी बाजारपेठेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, पोलिसांनी राखीव पोलिस दलाचा बंदोबस्त वाढवला होता.

पोलिस ठाण्यात राजकीय कार्यकर्त्यांचा तुफान राडा झाल्याच्या प्रकाराची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनी पेठ पोलिस ठाण्ला भेट देत, परिस्थितीची माहिती घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT