Mumbai News : देशभरातली कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली शिर्डी चाकूने हल्ला करणाऱ्या हल्लेखोरामुळे हादरली. यात श्रीसाईबाबा संस्थानचे दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर आणखी एक जखमी आहे.
या हत्याकांडावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी संतापजनक प्रतिक्रिया देताना, त्यामागील कारणांवर पुन्हा लक्ष वेधलं आहे. 'मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय, त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे', याचा पुनरुच्चार सुजय विखेंनी केला.
सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले, "दोघांचा खून हा काही प्लांट मर्डर वाटत नाही. नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डरर आहेत. 'व्हाईटनर'ने जी नशा करतात, ते हे मुलं आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हे खून झाले आहेत. पैसे उकळण्यासाठी हे हल्ले केले आहेत". यात जात-पात नाही. नशेखोरांचे कृत्य आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात असेल, असेही सुजय विखे यांनी म्हटले.
शिर्डीत (Shirdi) वाढत्या भिकाऱ्यांच्या मुद्यावर सुजय विखेंनी पूर्वी विधान केले होते. त्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ झाला होता. सुजय विखेंनी त्याची पुन्हा आठवण करून दिली. शिर्डी गुन्हेगारी वाढली आहे. आम्ही जे बोललो होते, ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो, ते महाराष्ट्राला कळले असेल. मोफ अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे, असे सुजय विखे यांनी पुन्हा म्हटले.
शिर्डीतील दोन खुनाच्या घटनेनंतर सुजय विखे यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. तसेच शिर्डी पोलिस ठाण्यात जात, खुनाच्या घटनेच्या तपासाची माहिती घेतली. यावेळी मयत झालेल्या कुटुंबियांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात होते. त्यांच्याशी संवाद साधत, त्यांचे सांत्वन केले.
शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुढील दहा दिवसात काही महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेणार आहोत. शिर्डी सुंदर ठेवण्यासाठी हे निर्णय घ्यावेच लागतील. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित आठ तारखेला ग्रामस्थांच्या उपस्थित आचारसंहिता ठरवून, ती राबवली जाईल. यासाठी शिर्डीसह अहिल्यानगर जनतेने बरोबर यावं, असे आवाहन सुजय विखे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.