Girish Mahajan Nashik Guardian Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Nashik Guardian : महाजनांचा मोठा दावा! 'नाशिकचा पालकमंत्री मीच'; शिंदेसेना-राष्ट्रवादीनं कान टवकारले

BJP minister Girish Mahajan statement in Jalgaon that he is the guardian minister of Nashik has sparked unease among Eknath Shinde Shiv Sena and the NCP within the Mahayuti alliance : नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असून, गिरीश महाजनांनी नाशिकचा पालकमंत्री मीच असल्याचे सांगून महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण करून टाकली आहे.

Pradeep Pendhare

Nashik Guardian Minister controversy : नाशिकमधील कुंभमेळा जवळ आलाय. तिथल्या नियोजन कामाचा धडाका सुरू आहे. अनेक वाद होऊन देखील भाजप मंत्री गिरीश महाजन हेच नाशिक संदर्भात प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णय घेताना दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य कारभारातील वरिष्ठ नेते अन् संकटमोचन म्हणून त्यांची यातून ओळख निर्माण झाली आहे. यातूनच मंत्री महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रीबाबत मोठं विधान केलं आहे.

भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन यांनी, जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कुंभमेळा जवळ येत असून, नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत काय होत आहे, असा प्रश्न केल्यावर त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. 'मी महिन्यातले वीस ते 25 दिवस नाशिकमध्येच असतो. त्यामुळे सर्वांवा वाटते की मीच पालकमंत्री आहे,' अशी प्रतिक्रिया मंत्री महाजन यांन दिली.

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, "पालकमंत्री पदामुळे काय फरक पडतो आहे? मला तर एक टक्का सुद्धा फरक पडत नाही. त्यात ते असलं काय अन् नसलं काय, मी माझं काम करतो आहे. महिन्यातले वीस ते 25 दिवस, मी नाशिकमध्ये राहतो. त्यामुळे सर्वांना असं वाटते की, मीच पालकमंत्री आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये लोक माझा पालकमंत्री म्हणूनच उल्लेख करतात. "

मीच पालकमंत्री आहे, असा शब्दप्रयोग मंत्री महाजन यांच्याकडून झाल्याने अन् तो लक्षात आल्याने, महाजनांनी तो पुढे सावरून घेतला. 'माझ्या मनामध्ये काहीही नाही. पालकमंत्री झालो, नाही झालो तरी, फरक पडत नाही. मुख्यमंत्री ज्या वेळेला हा निर्णय घेतील, त्या वेळेला हा विषय क्लियर होईल. माझ्यासाठी झालं तरी, चांगला आहे आणि नाही झालं तरी, चांगला आहे,' असे सावरत मंत्री महाजन यांनी वेळ मारून नेली.

भुसे, भुजबळ इच्छुक असूनही...

मंत्री गिरीश महाजन यांनी, नाशिकची मीच पालकमंत्री असल्याचे विधान केल्याने, महायुतीमधील मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचे नाशिकमधील नेते सावध झाले आहेत. शिंदेसेनेकडून मंत्री दादा भुसे अन् राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ हे पालकमंत्रीपदाची इच्छुक होते.

महाजनांच्या नावासमोर कुंभमंत्री

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून बराच वाद देखील झाला. परंतु सध्या तरी मंत्री महाजन नाशिकसंदर्भातील सर्व प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरचे निर्णय घेताना दिसत आहे. त्यामुळे तेच सध्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय कुंभमंत्री म्हणून भाजपने त्यांची घोषणा केली आहे.

मित्रपक्ष असून नसल्यासारखे...

रायगड अन् नाशिक इथल्या पालकमंत्रीपदाचा वाद महायुतीत सतत उफाळतो आहे. मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्याच्या तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयात, त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे महायुतीचे मित्रपक्ष इथं सत्तेत असून नसल्यासारखेच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT