Akshay Kardile Controversy : राहुरीत निवडणुकीपूर्वीच ‘वार’! सर्व्हेचे फोन, ट्रूकॉलरला कर्डिलेंच्या नावामागे..; कार्यकर्ते संतप्त, नेमकं प्रकरण काय?

Rahuri Assembly by-election, an objectionable post targeting BJP Akshay Kardile has gone viral, prompting party workers to demand police action : भाजपचे अक्षय कर्डिले यांच्याविषयी सर्व्हेच्या फोनवर आक्षेपार्ह मजकूरमुळे राहुरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Akshay Kardile Controversy
Akshay Kardile ControversySarkarnama
Published on
Updated on

Rahuri Assembly Bypoll : राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक पुढील आठवड्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु निवडणुकीपूर्वीच अक्षय कर्डिले यांना टार्गेट करण्याचा प्रकार झाला आहे. पोटनिवडणुकीमुळे सर्व्हेसाठी फोन सुरू झाले आहेत. आज सकाळपासून राहुरी मतदारसंघातील मतदारांना व्हाईस काॅल करण्यात आले.

ज्या मतदारांच्या मोबाईलमध्ये ट्रूकॉलर अ‍ॅप होते, त्यावर अक्षय कर्डिले यांच्या नावामागे आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचं समोर आलं. हा शिवराळ शब्द असल्याने कर्डिले समर्थकांमध्ये संताप उसळला. असा कोणताही सर्व्हे भाजप किंवा कोणत्याही एजन्सीकडून सुरू नसल्याचं समोर येताच, यामुळे कर्डिले समर्थक अधिकच आक्रमक झाले. दरम्यान, या प्रकाराचा राहुरी मतदारसंघातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील निषेध नोंदवला आहे.

भाजपचे (BJP) दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचं अकाली निधन झाले. यानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. पुढील आठवड्यात पोटनिवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे. विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा सर्व्हे सुरू आहेत.

या सर्व्हेसाठी 7971753352 आणि 7971831060 या क्रमांकावरून राहुरी (Rahuri) मतदारसंघातील मतदारांना (Voter) व्हॉईस कॉल केले गेले. बहुतांशी मतदारांकडे मोबाईलमध्ये ट्रूकॉलर अ‍ॅप आहे. व्हॉईस कॉल आल्यावर तिथं अक्षय कर्डिले यांचे नाव यायचे. पण त्यांच्या नावामागे आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता.

Akshay Kardile Controversy
Hindu girl Muslim youth marriage : लग्नाच्या बोहल्यावरच थरार! तितक्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोहोचले; अन् अरमान शेखचा...

हा प्रकार कर्डिले यांच्या समर्थकांच्या लक्षात आला. काहींनी वरिष्ठापर्यंत चौकशी केली. यानंतर कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. कर्डिले समर्थकांनी एकत्र येत पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत, संबंधित व्हॉईस कॉल करणाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

Akshay Kardile Controversy
Sagar Moholkar : कुख्यात पैलवान मोहोळकरची ‘राक्षसी ताकद’ की फक्त मिथक? तोंडातून गोळी काढल्याची चर्चा पुन्हा रंगली

राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यातील गावागावातील वातावरण दूषित करण्याचा प्रकार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला. दरम्यान, या प्रकाराचा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील निषेध केला आहे. या प्रकारामागे जो कोणी असेल, त्यावर कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

संदीप कर्डिले, गोविंद वाघ, अनिल करांडे, रावसाहेब कर्डिले, दत्ता तापकिरे, संभाजी पालवे, राहुल पानसरे, सागर बनकर, यशवंत पानमळकर यांनी पोलिस अधीक्षकांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देत कारवाईची मागणी केली आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी (ता.9) सकाळी 10 वाजता पोलिस अधीक्षक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com