Congress agitation at Nandurbar
Congress agitation at Nandurbar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress: भाजप सरकारच्या अन्यायायाविरोधात लढा उभारावा!

Sampat Devgire

मंदाणे : देशात अतिशय गलिच्छ राजकारण सुरू असून, गोर गरिबांना जीवन जगण्यास असह्य करून सोडणाऱ्या भाजप (BJP) सरकारच्या अन्याय व हुकूमशाही धोरणांविरोधी लढा देण्याची आता वेळ आली आहे. हा लढा देण्यासाठी राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या (Congress) माध्यमातून युवकांनी तयार राहावे असे आवाहन राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य सहप्रभारी वंदना बेन (Vandana Ben) यांनी केले. (Youth Congress workers shall create awareness in people On BJP`s negative politics)

शहादा (जि. नंदुरबार) येथे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे ‘माझा गाव-माझी शाखा’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. देशात प्रथम आधार कार्ड वाटप झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली(ता.शहादा) या गावात युवक काँग्रेस कडून शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. पद्माकर वळवी, उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रशांत ओगले, नंदुरबार जिल्हा प्रभारी किरणकुमार पाटील, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, जि. प. सदस्य जाण्या पाडवी, डॉ. योगेश पावरा, पं. स. सदस्या ललिता शेवाळे, पं. स. सदस्य गोपी पावरा, किशोर पाटील, दिनेश पवार, ओरसिंग पटले, देवा पानपाटील, तुषार ईशी, दिलीप पावरा, शांतिलाल पाटील आदी उपस्थित होते.

माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी भाजप सरकारने देशातील तरुणांना बेरोजगार बनवायला सुरवात केली असून, विविध फसव्या योजनांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जवळपास १२८ युवकांना विविध पद देऊन मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाखा राबविण्यात येणार असल्याचे नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रीतेशकुमार पाडवी, नवापूर विधानसभा अध्यक्ष पराग नाईक, धडगाव विधानसभा अध्यक्ष दिग्विजय पाडवी, शहादा विधानसभा उपाध्यक्ष योगेश पाटील, राजेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT